-
तुळशीच्या पाण्याचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत. अनेक घरगुती उपायांमध्ये तुळशीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. (फोटो : Freepik)
-
आज आम्ही तुम्हाला तुळशीचे पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे सांगणार आहोत. (फोटो : Freepik)
-
तुळशीच्या पानांचे पाणी रोज रिकाम्या पोटी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते कसे बनवायचे आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात.(फोटो : Freepik)
-
तुळशीचे पाणी चयापचय वाढवण्यास मदत करते. यामुळे, चरबी आणि कार्बोहायड्रेट बर्न करण्यास मदत होईल. (फोटो : Freepik)
-
तुळशीचे पान चयापचय वाढवण्यास मदत करते. यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते.(फोटो : Freepik)
-
जर तुम्हाला अपचन आणि अॅसिडिटीची समस्या असेल तर रोज २ ते ३ पाने चावून खा. (फोटो : Freepik)
-
तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटीबायोटिक गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात. (फोटो : Freepik)
-
तुळशीच्या पानांचे पाणी करण्यासाठी एका पातेल्यात एक ग्लास पाणी घालून चांगले उकळू द्या. पाणी उकळल्यावर तुळशीची पाने घाला.(फोटो : Freepik)
-
हे पाणी उकळा. यानंतर, गॅस बंद करा आणि फिल्टर करा. चव वाढवण्यासाठी मध देखील यामध्ये मिक्स केला जाऊ शकतो.(फोटो : Freepik)
तुळशीची पाने चावून खाण्यापेक्षा ‘या’ पद्धतीने खा, होतील अधिक आरोग्यवर्धक लाभ!
Tulasi Water Benefits : तुळशीमध्ये औषधी गुण असतात, त्यामुळे ती विविध आजारांवर फायदेशीर ठरू शकते. तुळस रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यात मदत करते.
Web Title: Beneficial to drink basil water on an empty stomach every day tulsi water benefits for babies how to make tulsi water srk