• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. things mothers should keep in mind while bringing up children parenting tips snk

Good Parenting : मुलांवर चांगले संस्कार करताना प्रत्येक आईला माहिती पाहिजेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

मुलांची काळजी घेताना, आईने काही विशेष गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून मुलांमध्ये असे गुण विकसित होतील जे त्याला आयुष्यात पुढे जाण्यास आणि एक चांगली व्यक्ती होण्यास मदत करतील.

Updated: December 28, 2023 14:09 IST
Follow Us
  • Things Mother Should Keep In Mind,Lifestyle,Parenting Tips,
    1/12

    Parenting Tips : कोणत्याही व्यक्तीसाठी त्याची आई महत्त्वाची व्यक्ती असते. आई ती असते जी मुलाला जन्म देण्याबरोबरच त्याचे योग्य संगोपन करून समाजात वावरण्यास सक्षम बनवते. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 2/12

    आई म्हणून मुलाचे संगोपन करणे हे एक मोठे आव्हान असते आणि हे आव्हान पूर्ण करण्यात आईच्या आयुष्याचा मोठा भाग जातो.  (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 3/12

    परंतु, मुलांची काळजी घेताना, आईने काही विशेष गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून मुलांमध्ये असे गुण विकसित होतील जे त्याला आयुष्यात पुढे जाण्यास आणि एक चांगली व्यक्ती होण्यास मदत करतील. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 4/12

    संयम सर्वात महत्वाचा आहे
    मुलाचे संगोपन करताना आईने संयम बाळगणे खूप महत्वाचे आहे. लहान मुलं तांडव करतात, हट्टी असतात आणि अनेक चुका करतात, अशा परिस्थितीत आईला धीर न सोडता त्यांना सांभाळले पाहिजे. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 5/12

    मुलांसह स्वतःची काळजी घ्या
    जेव्हा तुम्ही मुलाचे संगोपन करता तेव्हा तुमचा बहुतेक वेळ मुलाची काळजी घेण्यात जातो. पण, याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःकडे अजिबात लक्ष देऊ नका.

  • 6/12

    आई असण्यासोबतच तुम्ही एक माणूस देखील आहात, त्यामुळे तुमचे छंद जोपासा आणि तुमच्या दैनंदिन जीवनात स्वतःसाठी वेळ काढा. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 7/12

    मदती मागण्यासाठी लाजू नका
    अनेक वेळा आई थकून जाते कारण मुलांना सांभळताना खूप काम करावे लागते. त्यामुळे याबाबतीत तुमच्या कुटुंबीयांची किंवा मित्रमंडळींची मदत घेणे ही वाईट गोष्ट नाही. एकमेकांच्या मदतीनेच कुटुंबे टिकतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा कामाचे ओझं स्वतःवर न घेता तुम्ही कुटुंब आणि मित्रांची मदत घेऊ शकता. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 8/12

    आपल्या चुकांमधून शिका
    जगात कोणीही परिपूर्ण नाही. तुमच्याही पालकत्वात चुका होऊ शकतात. या गोष्टी मनावर घेण्याऐवजी त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातून धडा घ्यावा. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 9/12

    मुलांच्या मैत्रीवर लक्ष ठेवा
    आपल्या मुलांना चांगली संगत देणे हे आईचे कर्तव्य आहे. तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता त्यांच्याकडूनच तुमचे मूलही शिकेल. आपल्या मुलांबरोबर वेळ घालवावा आणि त्यांच्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. यासह, तुमचे मूल चांगले जीवन जगण्यासाठी नवीन गोष्टी शिकतील. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 10/12

    खूप कडकपणा आवश्यक नाही
    जर तुमचे मूल काही शिकत नसेल किंवा ते खूप त्रास देत असेल, तर फार कठोर वागण्याची गरज नाही. मुलं निरागस असतात, एक क्षण रडतात आणि दुसऱ्या क्षणी हसतात. त्यांच्याशी कधी प्रेमाने वागा, समजावून सांगा आणि मूल किती आनंदी राहते ते पहा. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 11/12

    मुलांना अट घालून किंवा आमिष दाखवू काम करण्यास भाग पाडू नका
    कोणत्याही कामासाठी मुलाला काहीही देण्याची अट नसावी. ते काम करण्यासाठी त्याला योग्य प्रकारे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा. पण त्याला काही काम केले तरच बक्षीस मिळेल, अशा अटी घालू नयेत. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 12/12

    तसेच त्याला कोणत्याही गोष्टीचे आमिष दाखवून कोणतेही काम करण्यास भाग पाडू नये. असे केल्याने, तुमचे मूल प्रत्येक कामात लोभाला जास्त महत्त्व देईल. आणि जीवनात पुढे जाण्यात अडचणी येतील. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

TOPICS
आईMotherपालकParentsपालकत्वParentingलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Things mothers should keep in mind while bringing up children parenting tips snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.