-
Jealousy : हेवा, आसुया, मत्सर आणि ईर्षा अशा भावना आहेत ज्यामुळे नातेसंबंध बिघडतात. एवढेच नाही तर त्याचा मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
-
याचबरोबर व्यक्तीच्या सर्जनशीलतेवरही परिणाम होतो. ही भावना वाटणे सामान्य गोष्ट आहे पण या भावनेच्या आहारी जाऊन चूकीचे वागणे नात्यांमध्ये तणाव निर्माण करू शकते.
-
जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी ईर्षेची भावना वाटत असेल तर काय करावे? मनातील मत्सर कसा काढून टाकावा हे समजत नसेल तर काळजी करू नका आम्ही तुमची मदत करणार आहोत.
-
ईर्षेच्या भावनेतून मुक्त होण्यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही सांगणार आहोत त्याचे पालन करा आणि तुमचे मानसिक आरोग्य जपा.
-
मनातील मत्सरभाव कसा काढून टाकावा?
मत्सराची भावना कशी ओळखावी?
जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी ईर्षा जाणवत असेल तर सर्वप्रथम ती स्विकार करा आणि तुम्हाला असे का वाटत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ही भावना नक्की कशामुळे तुमच्या मनात आली याचा शोध घ्या. ईर्षेची भावना व्यक्तीला आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे जाणवते. एकदा तुम्हाला तुमच्या मत्सराच्या भावनेमागील कारण समजले तर तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता. -
ईर्षेची भावना नष्ट करा
ईर्षेची भावना नष्ट करण्यासाठी तुमच्या मनात कोणत्या गोष्टीमुळे ही भावना येते हे ओळखा. भुतकाळातील एखाद्या घटनेमुळे तुमच्या मनात ही भावना येत असेल ज्यामुळे मत्सराची भावना निर्माण होत असेल.. -
तुम्ही याबाबत तुमच्या जवळच्या व्यक्तीला विश्वासात घेऊ शांतपणे बोलू शकता. तुमचे मन मोकळे करू शकता जेणे करून तुमच्या मनातील ही भावनी नष्ट होईल
-
जोडीदारासह संवाद साधा
तुमच्या जोडीदाराबाबत तुम्हाला ईर्षा वाटत असेल तर त्यांच्याशी संवाद साधा. तुमच्या जोडीदाराला तुमच्या मनातील ही भावना सांगितली तर त्यातून बाहेर येण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल. जोडीदारासह मनातील भावाना शेअर केल्यास तुम्हाला मत्सराच्या भावनेतून मुक्त होण्यास मदत होईल. (सर्व फोटो सौजन्य – फ्रिपीक)
मनातील ईर्षेमुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो परिणाम? मत्सर दूर करण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या
जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी इर्षेची भावना वाटत असेल तर काय करावे? मनातील मत्सर कसा काढून टाकावा?
Web Title: How to get over to jealousy and improve your mental snk 94health