-
कोथिंबीर अधिक काळ ताजी आणि हिरवी ठेवण्यासाठी, नीट साफ करुन घ्या आणि हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे कोथिंबिरीचे शेल्फ लाइफ वाढेल.
-
कोथिंबीर साफ करा. यानंतर चांगली धुवा आणि वाळवा. आता तुमच्या पद्धतीने त्याचे देठ कापून टाका. यानंतर स्वच्छ धुवून वाळवलेली कोथिंबीर हवाबंद डब्यात ठेवा. अशा प्रकारे कोथिंबीर दोन आठवड्यांपर्यंत ताजी राहू शकते.
-
कोथिंबीर हिरवीगार ठेवण्याची एक सोपी ट्रिक म्हणजे ती झिप-लॉक बॅगमध्ये साठवणे. तुमच्याकडे झिप-लॉक बॅग नसल्यास तुम्ही ती खरेदी करू शकता.
-
सर्वप्रथम कोथिंबीर धुवून त्याची मुळे कापून घ्या. कोथिंबीरीच्या पानांमधून पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर ते व्यवस्थितपणे झिप-लॉक बॅगमध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा.
-
कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी क्लिंग रॅपमध्ये गुंडाळा. ती सुकू नये म्हणून क्लिंग फिल्ममध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे कोथिंबीर आठवडाभर ताजी आणि टवटवीत राहिल.
-
कोथिंबीर विकत घेतल्यानंतर त्याची मुळे कापून टाका आणि ती धुवून स्वच्छ करा, आता ती धुतल्यानंतर कापडावर वाळवा. कोथिंबीरमधील पाणी सुकल्यानंतर स्वच्छ प्लास्टिकच्या डब्यात ठेवा आणि टिश्यू पेपरने झाकून झाकण बंद करा. अशा प्रकारे कोथिंबीर दोन आठवडे हिरवी राहू शकते.
-
कोथिंबीर ताजी ठेवण्याची आणखी एक ट्रिक म्हणजे ती स्वच्छ करून पाण्यात भिजवणे. यासाठी अर्धा ग्लास पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये कोथिंबीर मुळीसकट ठेवा. दररोज पाणी बदला आणि ग्लास फ्रिजमध्ये ठेवा. अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीर तीन आठवड्यांपर्यंत ताजी ठेवू शकता.
Kitchen Hacks : कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स
Easy hacks to increase shelf life of coriander leaves : कोंथिबीर जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
Web Title: Kitchen hacks how to preserve coriander kitchen hacks health tips marathi news sc ieghd import