• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. heres why you should start your day with fenugreek seeds or methi water know what dietitian says snk

सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी का प्यावे? आहारतज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे

“वजन कमी करण्यासाठी मेथी हा सर्वोत्तम पदार्थ आहे,” असे आहारतज्ज्ञ मॅक सिंग यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे.

Updated: January 5, 2024 10:59 IST
Follow Us
  • Why You Should Start Your Day With Fenugreek Seeds
    1/9

    लहान पिवळ्या बिया म्हणजे मेथी दाणे किंवा fenugreek आपल्या भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. या मेथीच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहेत. ज्यांना वजन कमी करण्यासाठी लोक मेथीच्या बियांचा वापर जास्त करतात. “वजन कमी करण्यासाठी मेथी हा सर्वोत्तम पदार्थ आहे,” असे आहारतज्ज्ञ मॅक सिंग यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 2/9

    ”मेथीच्या बिया उष्ण असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमचे पोट बिघडू शकते. त्यामुळे जर तुम्ही डायबेटीज रुग्ण असाल तर काळजी घ्या आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेथीचे सेवन करा,” अशी चेतावनीदेखील मॅक यांनी दिली आहे. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 3/9

    मेथीचे दाणे आरोग्यासाठी भरपूर फायदे देतात. आहारतज्ज्ञ मॅक यांनी मेथीच्या बियांचे काही फायदे सांगितले आहेत.
    १) मेथीमध्ये फायबर, मिनरल्स आणि इतर न्युट्रिशिअंट्स असतात. एक चमचा बियांमध्ये दैनंदिन प्रमाणापैकी २० टक्के लोह, ७ टक्के मँगनीज आणि ५ टक्के मॅग्नेशियम शरीराला मिळते. (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

  • 4/9

    २) या बियांमुळे हँगओव्हर कमी होतो आणि पोट भरलेले आहे असे वाटते, ज्यामुळे जास्त अन्न खाल्ले जात नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते. मेथीच्या बियांमध्ये असलेले म्यूसिलेज हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल जळजळ शांत करण्यास मदत करते आणि पोट आणि आतड्या भोवती (intestinal walls) आवरण तयार करते. छातीत होणारी जळजळ आणि ॲसिड रिफ्लक्ससाठी (Acid reflux) हे चांगले आहे असे मानले जाते.ecretion) सुधारू शकते आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवू शकते. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 5/9

    ३) मेथीमध्ये आढळणारे सॅपोनिन्स (Saponins) हे फॅट्स असलेल्या पदार्थांमधून मिळणाऱ्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. काही संशोधनानुसार, सॅपोनिन्स शरीराला कमी कोलेस्टेरॉल निर्माण करण्यास मदत करते, विशेषत: एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉल तयार करण्यास मदत करू शकते. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 6/9

    ४) मेथीच्या बिया या हायपरग्लाइसेमिक सेटिंग्जअंतर्गत (hyperglycemic settings) होणारा इन्सुलिनचा स्राव (insulin secretion) सुधारू शकते आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवू शकते. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 7/9

    ५) ‘तसेच, या बिया महिलांकरिता PCOS किंवा PCODच्या समस्यांसाठी उत्कृष्ट आहेत, ॲनिमियावर उपचार करण्यास मदत करतात, स्तनांमध्ये दुधाचे उत्पादन वाढवतात, मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करतात आणि तसेच कर्करोग टाळण्यास मदत करू शकतात. तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवतात,”असे सिंग सांगतात. (फोटो सौजन्य – फ्रिपीक, लोकसत्ता संग्रहित छायचित्र)

  • 8/9

    मेथीच्या वापराबाबत आणखी संशोधनाची आश्यकता
    पण, या निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी, योग्य डोस आणि वापराचा कालावधी निश्चित करण्यासाठी आणि इतर संभाव्य आरोग्य फायदे जसे की जळजळ कमी करणे, रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारणे आणि पाचक आरोग्य वाढवणे यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे,” असे नानावटी येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहार आणि पोषण विभाग प्रमुख उषाकिरण सिसोदिया यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 9/9

    मेथीचे सेवन कसे करावे?
    एक-दोन चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजवा. रात्रभर ठेवा.
    हे शून्य-कॅलरी असलेले डिटॉक्स पेय सकाळी रिकाम्या पोटी प्या.
    उरलेले मेथी दाणे चावून खा. (फोटो सौजन्य – पिक्सेल, लोकसत्ता संग्रहित छायचित्र)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Heres why you should start your day with fenugreek seeds or methi water know what dietitian says snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.