-
कबुतर सतत बाल्कनीमध्ये येऊन घाण करतात, असे बहुतांश ठिकाणी तुम्ही पाहिले असेल. तुमच्या बाल्कनीची स्वच्छता राखण्यासाठी, खूप खर्चाने सजवलेला लुक खराब न करण्यासाठी काय करावे हे तुम्हीही शोधताय का?
-
कबुतरांनी केलेल्या या घाणीमुळे तसेच त्यांच्या पंखांमुळे श्वसनाशी निगडित आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आपण कबुतरांपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहणार आहोत
-
कबुतरांना खिडकीत येण्यापासून रोखण्यासाठी आपण खिडकीच्या ग्रीलमध्ये किंवा तुम्ही बैठ्या घरात राहात असाल तर खिडकीच्या खाली काही रोपं लावू शकता
-
बाल्कनीत चमकदार गोष्टी ठेवा, चमकदार गोष्टी असतील तिथे कबूतर जाणे टाळतात. आरसे असणारे ड्रीमकॅचर किंवा सीडी वापरलेल्या शोभेच्या वस्तू खिडकीजवळ ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
-
कबुतरांना व्हिनेगरचा वास आवडत नाही, त्यामुळे कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून थांबवण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. २-३ चमचे व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि थोडे पाणी मिसळून मिश्रण तयार करून बाल्कनी पुसून काढा.
-
काटेरी वनस्पती खिडकीत असल्यास यामुळे कबुतरं खिडकीत येण्यास घाबरतात. यामुळे खिडकीचा लुकही सुंदर होण्यास मदत होते. त्यामुळे एखादं निवडुंगाचं छोटं रोपं ठेवू शकता.
-
तुम्ही लसणाचे रोप लावू शकता किंवा त्वरित परिणाम हवा असेल तर लसूण स्प्रे सोल्यूशन देखील बनवू शकता जे पक्ष्यांना दूर ठेवण्यास मदत करेल. यासाठी लसूण, पाणी आणि व्हिनेगर मिसळा, थोड्यावेळ नीट सर्व अर्क उतरून पाणी राहूद्या व मग कबुतरं सतत येतात अशा ठिकाणी स्प्रे करा.
-
बाल्कनीत पुदिन्याची पाने ठेवू शकता पुदिन्याच्या पानाच्या दर्पामुळे पक्षी या पानांपासून अधिक दूर राहतात. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Jugaad: कबुतरं खिडकीत घाण करण्याऐवजी थेट मारतील यु टर्न! बाल्कनीत करा ‘हे’ सोपे उपाय, वाचवा त्रास व पैसे
How To Keep Pigeons Away From Balcony And Clean Poop Stains: आज आपण कबुतरांपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहणार आहोत.
Web Title: Simple solution to keep pigeons away from balcony how to clean poop stains of pigeon from balcony cleaning jugaad save money svs