-
Skipping Wheat Roti For 30 Days: एक प्रयोग म्हणून ३० दिवसांसाठी गव्हाचे सेवन बंद केल्यास शरीरात नेमके काय बदल होऊ शकतात याविषयी वरिष्ठ आहारतज्ज्ञ लक्ष्मी यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
-
सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे गहू हे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढवणारे धान्य म्हणून ओळखले जाते. तुमच्या आहारातून गहू काढून टाकल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते.
-
ग्लूटेनचा त्रास असणाऱ्या आणि लठ्ठपणा यासारख्या इतर परिस्थितींना प्रतिबंध करण्यास देखील हा प्रयोग मदत करू शकतो.
-
गव्हामध्ये सुद्धा कार्ब्स असतात. गव्हाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचन मंदावते, ज्यामुळे गॅस, पोटात गोळा येणे, मळमळ, पोटदुखी, उलट्या आणि पेटके येणे असे त्रास होऊ शकतात. कमी गहू खाल्ल्याने पचनप्रक्रिया सुरळीत काम करते.
-
गव्हात फायबर मुबलक प्रमाणात असतं, पचनसंस्था चांगले काम करते. तुमच्या आहारात फायबरयुक्त गहू जोडल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.
-
गहू हा व्हिटॅमिन बी चा स्त्रोत आहे.जो ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि पेशी आणि ऊतींचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक आहे. गहू टाळल्याने बी जीवनसत्वाची कमतरता निर्माण होऊ शकते.
-
गव्हाला पर्याय म्हणून आपण फायबर, लोह आणि मॅग्नेशियम, प्रोटीनचा स्रोत असणारा क्विनोआ, हृदयाच्या आरोग्यासाठी फायबर प्रदान करणारे ओट्स व उच्च फायबर आणि आवश्यक खनिजे युक्त ब्राऊन तांदूळ, आहारात समाविष्ट करू शकता
-
गहू फायबर, व्हिटॅमिन बी, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे आवश्यक पोषक पुरवतो, ज्यामुळे एकंदर आरोग्याला मदत होते.
-
विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती नसलेल्या व्यक्तींसाठी, संपूर्णपणे गहू काढून टाकणे अनावश्यक असते. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
३० दिवस पोळ्यांचे सेवन बंद केल्यास शरीरामध्ये काय बदल दिसतील? तज्ज्ञ सांगतायत, महिनाभर गहू न खाल्ल्यास..
Skip Roti For Month: ३० दिवसांसाठी गव्हाचे सेवन बंद केल्यास शरीरात नेमके काय बदल होऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती आहारतज्ज्ञांकडून जाणून घेऊया..
Web Title: Should you stop eating wheat for weight loss how skipping roti chapati for 30 days change your body blood sugar doctor answers svs