-
आपण वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात राहतो. त्यामुळे रोज तेच काम, तेच वातावरण, तोच प्रवास करुन खूप कंटाळा येतो.
-
अनेकदा मानसिक नैराश्य, चिंता, तणाव आणि शारीरिक आजारांचा सामना करावा लागतो. परंतु, या रोजच्या त्रासापासून थोडे दूर राहत तुम्ही सुट्टीच्या दिवसात एक प्राचीन जपानी थेरपी फॉलो करू शकता.
-
या थेरपीमुळे तु्म्हाला ऑफिसमधील कामाचा ताण, नैराश्य, चिंता अशा अनेक समस्यांपासून दूर राहता येऊ शकते. तसेच रोज आनंदी, मोकळ्या वातावरण जगता येऊ शकते.
-
‘शिनरीन योकू’ थेरपी म्हणजे काय?
या थेरपीला जपानी भाषेत ‘शिनरीन योकू’ असे म्हणतात, तर ती ‘फॉरेस्ट बाथिंग’ या नावाने सर्वत्र प्रचलित आहे. यात निसर्गातील वातावरणात स्वतःला एकरुप करत शारीरिक, मानसिक आणि भावनिक आजार दूर करता येतात. यामुळे ‘शिनरीन योकू’ या उपचारात्मक थेरपीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. -
या थेरपीसाठी तुम्हाला जंगलात चालणे, बसणे, उभे राहणे किंवा मोकळेपणाने श्वास घेणे यासारख्या गोष्टी करणे आवश्यक आहे.
-
सुंदर निसर्गरम्य वातावरणात राहिल्याने थकाव दूर होत आराम वाटतो, तणाव कमी होतो, मूड सुधारतो. निसर्गामुळे मानसिक आरोग्यामध्येही अनेक सकारात्मक बदल घडून येतात.
-
या थेरपीमुळे तणाव कमी होतो, चांगली झोप येते आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यात मदत होते, याशिवाय ही थेरपी तुमच्या बर्नआउटसाठी देखील फायदेशीर आहे.
-
प्रत्येकजण घनदाट जंगलात जाऊन दररोज शिनरीन योकू थेरपी करू शकत नाही. जे हे करू शकत नाहीत ते जवळच्या उद्यानात, शांत बागेत जाऊन शिनरीन योकू थेरपी करू शकतात.
Forest Bathing Therapy : तणाव, नैराश्य, चिंता काही मिनिटात होईल दूर! करुन पाहा ‘ही’ जपानी थेरपी
Shinrin yoku Japanese Therapy : निसर्गात राहून तु्म्हाला ही प्राचीन जपानी थेरपी करायची असते. या थेरपीला जपानी भाषेत ‘शिनरीन योकू’ असे म्हणतात, तर ती ‘फॉरेस्ट बाथिंग’ या नावाने सर्वत्र प्रचलित आहे.
Web Title: Shinrin yoku japanese therapy how to get rid of stress mental health tips marathi news sc ieghd import sjr