-
How Mild Jealousy Is Good For Relationship: प्रेमामध्ये मतभेद होणे आणि ईर्षेची भावना निर्माण होणे सामन्य गोष्ट आहे. हे जोडीदारावरील प्रेम आणि प्रेमात असल्याची भावना दर्शवण्याचा एक मार्ग आहे.
-
आजकाल तुमचा जोडीदार एखाद्या गोष्टीने दुखावला असेल तर, त्याला तुमचा हेवा वाटतो किंवा तो सतत स्वत:ला या भावनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, हे सूचित करते.
-
तुमच्यामध्ये एक मजबूत नातं निर्माण झालं आहे आणि तुमच्या नात्याला स्थिरता येत आहे.जोडीदाराच्या या वागण्याला निरोगी मत्सर (Healthy jealousy) म्हणता येईल.
-
केव्हा होते थोडीशी ईर्षा
जर तुमचा जोडीदार तुमच्याशिवाय दुसऱ्यांना वेळ देत असेल.
जर इतर कोणी (विशेषत: स्त्री किंवा पुरुष) तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवत असेल.
जर तुमचा जोडीदार त्याचे खास क्षण दुसऱ्या कोणाशी शेअर करत असेल. -
जर जोडीदार त्याचा छंद त्याच्या मित्रासोबत छंद शेअर करत असेल आणि त्याचा आनंद घेत असेल.
अशा परिस्थितीत जर तुम्हाला थोडा मत्सर वाटला तर ती सामान्य गोष्ट आहे. -
द कपलसेंटरच्या मते, मनात निर्माण होणाऱ्या मत्सराच्या भावनेवर नियंत्रण ठेवणे सोपे नसते, पण या नकारात्मक भावनांवर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता, हे महत्त्वाचे असते. हे निरोगी ईर्षेची चिन्हे आहेत.
-
असे टिकवा तुमचे नाते
भावना स्वीकारा
जर तुमच्या जोडीदाराबद्दल तुमच्या मनात अशा भावना असतील तर ते स्वीकारा. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. -
जोडीदाराबरोबर बोला
संभाषणातून प्रत्येक काम सोपे करता येते. म्हणूनच तुम्ही तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासोबत शेअर करता आणि तुम्हाला मत्सर वाटत होता हे सांगा. -
इतरांवर दोष देऊ नका
तुमच्या मनात नकारात्मक भावना येत असतील तर इतरांऐवजी स्वतःला दोष द्या. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. -
अस्वस्थ करणाऱ्या भावना टाळा
लक्षात ठेवा जर तुमची ही भावना तुमच्यावर वर्चस्व गाजवत असेल तर ते तुमचे नाते तुटू शकते. विश्वास संपुष्टात येऊ शकतो, वाद सुरू होऊ शकतात, तुम्ही तणाव आणि चिंतेने त्रस्त होऊ शकता आणि अशा प्रकारे हळूहळू एकमेकांबद्दलची ओढ देखील संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे वाईट भावना दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
प्रेमात थोडीशी Jealousy असावी? मनात ईर्षा असेल तर नाते कसे टिकवावे?
मनात निर्माण होणाऱ्या मत्सराच्या भावनेवर नियंत्रण ठेवणे सोपे नसते, पण या नकारात्मक भावनांवर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता, हे महत्त्वाचे असते.
Web Title: Relationships how mild jealousy is good for love relationship it affects emotion in certain way sign that your partner has this feeling snk