• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. kitchen jugaad 5 ways to save lpg gas cylinder know lpg saving tips hacks ndj

जास्तीत जास्त गॅस वाचवण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ खास टिप्स, जाणून घ्या, गॅस सिलेंडर जास्त दिवस कसा वापरता येईल?

LPG Saving Tips : असाच एक व्हिडीओ युट्यूबवर सुद्धा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गॅस सिलेंडर जास्त दिवस कसा वापरता येईल, याबाबत पाच टिप्स सांगितल्या आहेत. चला तर जाणून घेऊ या.

January 19, 2024 22:09 IST
Follow Us
    LPG Saving Tips Hacks
    गॅस सिलेंडर हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आज घरोघरी तुम्हाला गॅस सिलेंडर पाहायला मिळेल. दिवसेंदिवस घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढत आहे. (Photo : Freepik)
    त्यामुळे सामान्य नागरीक चिंतेत दिसतात पण टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला गॅस सिलेंडर जास्त दिवस कसा वापरता येईल, याबाबत टिप्स सांगणार आहोत. (Photo : Freepik)
    वजन ठिक असेल तर चांगले आहे नाहीतर सिलेंडर बदलून घ्यावे. कारण सिलेंडर जास्त दिवस आपल्याला टिकवायचा असेल तर त्यासाठी तो नीट भरलेला असणे गरजेचा आहे. (Photo : Freepik)
    तसेच ज्या दिवशी आपण सिलेंडर घरी आणला ती तारीख कॅलेंडरवर लिहून ठेवायची, यामुळे आपल्याला लक्षात येईल की सिलेंडर किती दिवस वापरण्यात आला. ही सवय जर कायम ठेवली तर सिलेंडर किती दिवस टिकेल याचा आपल्याला अंदाज राहील. (Photo : Freepik)
    गॅस बर्नर नियमित स्वच्छ करायचा जेणेकरुन हा योग्य प्रमाणात वापरला जाईल. जर बर्नरमध्ये कचरा किंवा काही घाण साचलेली असेल तर निळ्या ऐवजी थोड्या पिवळ्या रंगाची दिसते.त्यावेळी बर्नर स्वच्छ धुवून घ्यायचा. (Photo : Freepik)
    गॅसचा बर्नर स्वच्छ ठेवण्यासाठी गरम पाण्यात गॅसचा बर्नर ठेवायचा आणि त्यात थोडा लिंबू पिळून घ्यायचा. त्यात इनोचे संपूर्ण पॅकेट टाकायचे. दोन तीन तासांसाठी या मिश्रणामध्ये बर्नर भिजून ठेवायचे आणि त्यानंतर ब्रशनी बर्नर नीच घासून स्वच्छ धुवायचे. (Photo : Freepik)
    स्वयंपाक करण्यापूर्वी सर्व पूर्वतयारी आधीच करुन ठेवायची. जसे की भाज्या कापणे, लसूण निवडणे, मसाले वर काढून ठेवायचे. यामुळे फोडणी देताना गॅस कमी जास्त करावा लागणार नाही.कारण गॅस कमी जास्त केल्यामुळे गॅस वाया जाण्याची शक्यता असते. (Photo : Freepik)
    स्वयंपाकात शक्य असेल तिथे कुकरचा वापर करा. यामुळे स्वयंपाकाला कमी गॅस खर्च होईल आणि गॅसबरोबर वेळेची सुद्धा बचत होईल. तसेच डाळ आणि तांदूळ शिजवण्यापूर्वी किमान अर्धा तास तरी भिजत ठेवा. यामुळे सुद्धा डाळी किंवा तांदूळ लवकर शिजणार. स्वयंपाक करण्यापूर्वी सर्व पूर्वतयारी आधीच करुन ठेवायची (Photo : Freepik)
    गॅस वापरताना योग्य भांडे वापरा. प्रमाणानुसार भांड्याचा आकार निवडा. जर शेगडीमध्ये किंवा गॅसच्या नळीमध्ये थोडी फार लिकेज होत असले तर लगेच दुरुस्ती करुन घ्या. यामुळे गॅस वाया जाणार नाही. तसेच रेग्युलेटर आणि गॅसची नळी वेळोवेळी बदलून घ्यावी. गॅसचा वापर केल्यानंतर रेग्युलेटर नीट बंद करा. यामुळे गॅस वाया जाणार नाही आणि गॅस जास्त दिवस वापरता येईल. (Photo : Freepik)
TOPICS
गॅस सिलिंडरGas Cylinderटिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Kitchen jugaad 5 ways to save lpg gas cylinder know lpg saving tips hacks ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.