-
महिला आपल्या चेहऱ्याची खूप काळजी घेतात. त्यासाठी त्या बीबी क्रीम, सीसी क्रीम, फाऊंडेशन, कन्सीलर, प्रिमिअर असे अनेक प्रॉडक्ट वापरत असतात.
-
सौंदर्य वाढवण्यासाठी महिला अनेक महागड्या क्रिमचा वापर करतात. त्यापैकी एक बीबी आणि सीसी क्रीम आहे. पण, बहुतांशी महिलांना या दोन क्रीममधील फरक माहित नसतो.
-
बीबी आणि सीसी क्रीममध्ये काय फरक आहे आणि कोणत्या त्वचेच्या प्रकारासाठी कोणती क्रीम चांगली आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याबद्दल जाणून घ्या.
-
बीबी क्रीम: याला ब्युटी बाम, ब्लेमिश बाम किंवा ब्लिमिश बेस म्हणतात. हे तुमच्या त्वचेवर मॉइश्चरायझर आणि फाउंडेशन दोन्ही म्हणून काम करते. तसेच त्वचा कोमल आणि तजलेदार बनवते.
-
मेकअप करताना चेहऱ्यावर बीबी क्रीम लावल्यानंतर तुमचा मेकअप ग्लॉसी आणि चमकदार दिसतो. याशिवाय मेकअप चेहऱ्यावर बराच काळ टिकून राहतो.
-
बीबी क्रीममध्ये सिलिकॉन आणि सिलिका असते, जे तुमची त्वचा मऊ आणि डागमुक्त ठेवते.
-
सीसी क्रीम: सीसी क्रीम म्हणजे कलर करेक्टर क्रीम होय. नावाप्रमाणेच ती पिगमेंटेशन लपवून त्वचेचा टोन सारखा करते.
-
बीबी क्रीमच्या उलट सीसी क्रीम लावल्याने मॅट फिनिश मिळते. म्हणजेच ते लावल्यानंतर तुमची त्वचा अधिक मॅट दिसते आणि चेहरा उजळ दिसतो.
-
त्वचेसाठी सर्वोत्तम क्रीम : दोन्ही क्रीमचा त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. तुमची त्वचा कोरडी असल्यास, बीबी क्रीम तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझिंग करताना ते फाउंडेशनसारखे काम करते.
-
तेलकट त्वचा असलेल्या महिला सीसी क्रीम जास्त वापरू शकतात. ही क्रीम मॅट लूक मिळविण्यात मदत करू शकते. तसेच, जर तुम्ही दररोज कन्सीलर वापरत असाल तर सीसी क्रीम हा एक चांगला पर्याय आहे.
-
बीबी कोण वापरू शकत नाही?
त्वचेवर मुरुम किंवा पुरळ जास्त असल्यास किंवा त्वचा तेलकट असल्यास बीबी क्रीम वापरू नका. त्यामुळे मेकअप खराब होऊ शकतो. -
सीसी क्रीम कोण वापरू शकत नाही?
कोरडी त्वचा असलेल्या महिलांसाठी जर सीसी क्रीम वापरून मेकअप केला तर त्यामुळे तुमची त्वचा आणखी कोरडी होऊ शकते.
BB आणि CC क्रीममध्ये फरक काय? कोणत्या स्कीन टाइपसाठी कोणती क्रीम वापरणं चांगलं? जाणून घ्या
Difference Between Bb Cream And Cc Cream: अनेक महिला बीबी व सीसी क्रीम वापरतात, पण त्यांना त्यातला फरक माहित नसतो.
Web Title: Beauty tips know difference between bb cream and cc cream in marathi hrc