• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. kitchen jugaad how to store tomatoes for long days homemade tricks ndj

Kitchen Jugaad : जास्तीत जास्त दिवस टोमॅटो कसे साठवावे? जाणून घ्या भन्नाट जुगाड

खरंच टोमॅटो जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही का? टेन्शन घेऊ नका, टोमॅटो एका खास पद्धतीने साठवून ठेवता येऊ शकते. २० -२५ दिवस नाही तर तब्बल तीन महिने तुम्ही टोमॅटो साठवून ठेवू शकता. त्यासाठी ही ट्रिक तुम्हाला जाणून घ्यावी लागेल.

January 23, 2024 20:42 IST
Follow Us
  • how to store tomatoes for long time
    1/9

    टोमॅटो हा पौष्टिक गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. अनेकदा टोमॅटोचे भाव वाढतात अशावेळी टोमॅटो विकत घ्यावा की नाही, अशी परिस्थिती येते. (Photo : Freepik)

  • 2/9

    अनेकांना असे वाटते की कांद्याप्रमाणे टोमॅटो जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही. तीन चार दिवसानंतर टोमॅटो खराब होतात. त्यामुळे गरजेनुसार हे लोकं टोमॅटो विकत घेतात. (Photo : Freepik)

  • 3/9

    खरंच टोमॅटो जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही का? टेन्शन घेऊ नका, टोमॅटो एका खास पद्धतीने साठवून ठेवता येऊ शकते. (Photo : Freepik)

  • 4/9

    २० -२५ दिवस नाही तर तब्बल तीन महिने तुम्ही टोमॅटो साठवून ठेवू शकता. त्यासाठी ही ट्रिक तुम्हाला जाणून घ्यावी लागेल (Photo : Freepik)

  • 5/9

    युट्यूबवर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दीर्घकाळ टोमॅटो ताजे ठेवण्याची एक ट्रिक सांगितली आहे. (Photo : Freepik)

  • 6/9

    सुरुवातीला एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या त्यानंतर त्यात मीठ आणि हळद घाला. त्या पाण्यात टोमॅटो टाका. तीस मिनिटे हे टोमॅटो असेच ठेवा. तीन मिनिटानंतर हे टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. (Photo : Freepik)

  • 7/9

    त्यानंतर हे टोमॅटो चांगल्याने पुसून घ्या. प्रत्येक टोमॅटोभोवती न्यूजपेपर गुंडाळा. न्यूजपेपरनी पूर्णपणे टोमॅटो झाकून घ्या. (Photo : Freepik)

  • 8/9

    सर्व न्यूजपेपरनी झाकलेले टोमॅटो एका टोपलीत ठेवा आणि टोपली एका बंद कपाटात ठेवा. काळजी घ्या या टोमॅटोवर तीन महिने सूर्यप्रकाश पडू नये. (Photo : Freepik)

  • 9/9

    आठवड्यातून एकदा या टोमॅटोवरील न्यूजपेपर काढून बघा आणि त्यातील पिकलेले टोमॅटो वापरायला घ्या. टोमॅटो पिकले की ते इथलिन गॅस तयार करतात या गॅसमुळे इतर टोमॅटोंवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. हे पिकलेले टोमॅटो तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून वापरू शकता. (Photo : Freepik)

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Kitchen jugaad how to store tomatoes for long days homemade tricks ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.