-
शिजवलेले अन्न आणि कोणताही खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण फ्रिजमध्ये ठेवतो. फ्रिजमुळे हे पदार्थ काही दिवस ताजे राहतात. पण हे अन्नपदार्थ पुन्हा वापरताना किंवा खाताना काळजी घेतली पाहिजे. (photo – Freepik)
-
कारण, काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही खराब होतात आणि शरीरात टॉक्सिन तयार करतात. त्यामुळे फ्रिजमध्ये साठवलेल्या ७ पदार्थांबाबत तुम्हाला सांगणार आहोत जे जास्त दिवस झाले असतील तर ते आजचं बाहेर फेकून दिले पाहिजे. अन्यथा यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जाणून घ्या हे पदार्थ कोणते आहेत…(photo – Freepik)
-
मासे, मटण, चिकन वारानुसार अनेक जण आवडीने खातात. अनेकदा घरी बनवलेले मांसाहारी पदार्थ उरतात मग ते आपण फ्रिजमध्ये ठेवतो. तसेच बाजारातील पॅकिंग न शिवलेले मटण, मासेही फ्रिजमध्ये ठेवतो. (photo – Freepik)
-
मात्र प्रत्येक पदार्थाला एक एक्सपायरी डेट असते. त्याप्रमाणे शिजवलेले मासे किंवा मटण किती दिवस खाऊ शकतो यासाठी ठरावीक दिवस असतात. म्हणजे शिवलेले मटन, चिकन फ्रिजमध्ये जास्तीत जास्त पाच दिवस चांगल्याप्रकारे राहते. तर न शिवलेले पॅकिंग मटन, चिकन जास्तीत जास्त दोन ते तीन आठवडे सुरक्षित राहते. (photo – Freepik)
-
पण त्यापेक्षा जास्त दिवस हे पदार्थ तुम्ही फ्रिजमध्ये ठेवले असाल तर ते आजचं फेकून द्या. नाही तर त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच पुढच्या वेळी तुम्ही मासे, मटण फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर त्यावर तारखेचे एक लेबल लावा, म्हणजे तुम्हाला ते फ्रिजमध्ये किती काळ ठेवता येते हे लक्षात येईल.(photo – Freepik)
-
पनीर, चीज, बटर हे दुग्धजन्य पदार्थ फ्रिजमध्ये जास्त दिवस साठवू शकत नाही. हे पदार्थ फ्रिजमध्ये सुरक्षित राहत असले तरी ते एक्सपायर होण्याच्या आधी खाल्ले पाहिजे. अन्यथा ते लवकर खराब होतात. विशेषत: पनीर थोडं वापरून पुन्हा फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर ते लवकर खराब होण्याची दाट शक्यता असते. (photo – Freepik)
-
यात उन्हाळ्यात एकदा वापरून फ्रिजमध्ये ठेवलेले दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी फ्रिजमध्ये ठेवलेल्या पनीर, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ्यांच्या पॅकेटवरील एक्सपायरी डेट बघून ते खा, जर एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर फेकून द्या.(photo – Freepik)
-
अनेकजण लोणचं किंवा इतर आंबट पदार्थ फ्रिजमध्ये स्टोर करतात. रोजच्या जेवणात अनेक या पदार्थांचा वापर करतात. पण आंबट पदार्थ रोज वापरून फ्रिजमध्ये ठेवल्यास पटकन खराब होण्याची शक्यता असते. (photo – Freepik)
-
यात जर ते स्टील किंवा अॅल्युमिनियच्या भांड्यात असतील तर आणखी लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेल्या आंबट पदार्थांवर जर बुरशीजन्य काही पांढऱ्या रंगाचं दिसत असेल तर ते आजचं फेकून द्या. (photo – Freepik)
-
सॉस, चटणी, केचप आणि इतर मसालेदार पदार्थांचे पॅकेट फ्रिजमध्ये साठवले जातात. पण हे पदार्थ केवळ सहा महिन्यांपर्यंत साठवता येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला कितीही आवडणारा सॉस एक्सपायर होण्याआधी खाल्ला नाही तर तो फेकूनचं द्यावा लागेल. (photo – Freepik)
-
चटणी जास्तीत जास्त १ ते २ महिने फ्रिजमध्ये ठेवता येते. याशिवाय अंडी साधारणं दोन महिने फ्रिजमध्ये सुरक्षित राहतात. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेले हे पदार्थ वापरण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट चेक करा. (photo – Freepik)
-
अनेकदा चिकन किंवा मटणाचा रस्सा खाताना उरतो म्हणून तो आपण काढून फ्रिजमध्ये ठेवतो. पण हा रस्सा जास्तीत जास्त चार दिवसाच्या आत फ्रिजमधून काढून खावा लागेल. (photo – Freepik)
-
जर तुम्हाला चार दिवसात तो खाणं शक्य नसेल तर तो फ्रिजरमध्ये ठेवा. अशाप्रकारे तुम्ही चार दिवसांनंतरही गरम करून हा रस्सा खाऊ शकता.(photo – Freepik)
-
फ्रिजमध्ये वेगवेगळे फूड पॅकेट स्टोर करून ठेवायला अनेकांना आवडते. भूकेच्या वेळी फूड पॅकेटमधून थोड- थोड खाऊन भूक भागवली जाते. यात पेस्ट्री, केक, टेट्रा पॅकमधील ज्यूस अशा पदार्थांचा समावेश आहे. यात पॅकेटमधील ज्यूस काहीजण तोंड लावून पितात आणि पुन्हा तसचं फ्रिजमध्ये ठेवतात. (photo – Freepik)
-
अशाने तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया त्या पॅकेटला चिकटतात. तेच ज्यूस तुम्ही पुन्हा पिण्यासाठी घेतात तोपर्यंत अनेक बॅटेरिया त्या जमा होता. ज्यामुळे ज्यूस पॅकेट लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पॅकिंग केलेले फूड एकदा ओपन केलयानंतर चार दिवसांच्या आत खाऊन संपवा. जास्त दिवस झाले तर ते फेकून द्या. (photo – Freepik)
तुमच्या फ्रिजमध्ये ठेवलेले ‘असे’ ७ पदार्थ आजच फेकून द्या, अन्यथा…
घरातील फ्रीजमध्ये खाण्याच्या अनेक छोट्या- मोठ्या गोष्टी ठेवतो. मात्र त्या खाण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट चेक करत जा.
Web Title: Diy health tips 7 foods in your fridge that should be thrown sout sjr