• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. diy fruitarian diet health benefits risks what will happen if you eat fruits alone for three days sjr

Fruit Diet: सलग ३ दिवस फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतात? डॉक्टर काय सांगतात, वाचा

Fruitarian Diet plan : तीन दिवस फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतात याबद्दल डॉक्टरांकडून जाणून घेऊ

Updated: February 24, 2024 10:07 IST
Follow Us
  • diy fruitarian diet health benefits risks what will happen if you eat fruits alone for three days
    1/12

    अनेकजण वाढते वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स डाएटचा पर्याय निवडत आहेत. त्यात काहीजण फक्त फळं खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. (photo – freepik)

  • 2/12

    पण, ७२ तास कोणतेही जेवण न खाता फक्त फळं खाल्ल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? आणि त्यातून काय परिणाम दिसतात तुम्हाला माहित आहे का? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना गुरुग्राममधील नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. पंकज वर्मा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(photo – freepik)

  • 3/12

    तीन दिवस आहारात फक्त फळांचा समावेश करणे याला ‘फ्रुटेरियन डाएट’ म्हटले जाते. अशा प्रकारचा आहार जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सयुक्त वाटू शकतो. पण खरेच या आहारामुळे आपल्याला विविध फायदे मिळतात? याच मुद्द्यावर मेडिटेशनबायनेचर इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली आहे; ज्यात तीन दिवस फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतात याबद्दलची माहिती दिली आहे. (photo – freepik)

  • 4/12

    पोस्टनुसार फळांचा आहार सेवन केल्यास १२ तासांनंतर तुम्हाला पचनासंबंधित त्रास दूर होतात. शरीर फळांमध्ये असलेले पोषक घटक शोषून घेते; ज्यामुळे पोटासंबंधित आजारापासून आराम मिळतो. जसे की, पोटदुखी आणि पोट फुगणे. (photo – freepik)

  • 5/12

    २४ तासांनंतर शरीरातील नको असलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास सुरुवात होते. तुमचे शरीर पौष्टिक केटोसिसच्या अवस्थेत करते म्हणजे ते संचयित चरबीचा ऊर्जास्रोत म्हणून वापर करण्यास सुरुवात करते. पण, अशा या डाएटचा तुम्हाला खरेच फायदा होतो का? याविषयी पुढे डॉक्टरांनी आपली मते दिली आहेत. (photo – freepik)

  • 6/12

    डॉ. पंकज वर्मा यांच्या मते, ७२ तास फक्त फळांचे सेवन केल्यास शरीरात सकारात्मक – नकारात्मक असे दोन्ही परिणाम दिसू शकतात. सकारात्मक बाजूने विचार केल्यास फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स व फायबर्स असतात, जे सुधारित पचन, ऊर्जा पातळी वाढवण्यास व तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. (photo – freepik)

  • 7/12

    फळांमधील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेशन ठेवण्यास मदत होते. पण फळांचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. कारण- केवळ फळांवर अवलंबून राहिल्याने विविध आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याचा धोका वाढू शकतो, असे योगसूत्र होलिस्टिक लिव्हिंगच्या संस्थापक शिवानी बाजवा यांनी सांगितले. (photo – freepik)

  • 8/12

    आहारात केवळ फळांचा समावेश केल्यास शरीरास आवश्यक प्रथिने, चरबी, विशिष्ट जीवनसत्त्वे व खनिजे यांसारख्या आवश्यक पोषक घटकांची कमतरता जाणवू शकते. (photo – freepik)

  • 9/12

    फळांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे उर्जा वाढूही शकते किंवा कमीही होऊ शकते; ज्यामुळे चिडचिडेपणा वाढतो आणि एकाग्रता कमी होऊ शकते, असेही डॉ. वर्मा म्हणाले. (photo – freepik)

  • 10/12

    डॉ. वर्मा यांच्या माहितीनुसार, स्नायूंच्या मजबूतीसाठी प्रोटीन्सची खूप गरज असते, तर हार्मोन्स आणि विविध शारीरिक कार्यांसाठी फॅट्सची आवश्यकता असते. पण, शरीरास ठरावीक कालावधीत योग्य पोषक घटक न मिळल्यास स्नायूंचे नुकसान होऊ शकते. तसेच तुम्हाला थकवा जाणवू शकतो. (photo – freepik)

  • 11/12

    आहारात केवळ फळांच्या समावेश केल्यास तुम्हाला वजन वाढणे, मधुमेह, दात किडणे, पोषक घटकांची कमतरता, अशक्तपणा असा समस्या जाणवू शकतात. फळांचे सेवन केल्याने तात्पुरते समाधान मिळू शकते; परंतु सतत प्रथिने आणि चरबीच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते. त्यामुळे लवकरच भूक लागू शकते किंवा खाण्याची लालसा वाढू शकते. (photo – freepik)

  • 12/12

    यातील संभाव्य तोटे टाळण्यासाठी फळांची योग्य निवड आणि त्यात विविधता असणे गरजेचे आहे. फळांमध्ये अत्यावश्यक पोषक घटकांचा समावेश असला तरी संपूर्ण आरोग्यासाठी संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत फ्रुटेरियन आहार दीर्घकाळ शरीरास आवश्यक पोषक घटक देऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा डाएट प्लॅन सुरू करताना आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. (photo – freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Diy fruitarian diet health benefits risks what will happen if you eat fruits alone for three days sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.