• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. tea in weight loss diet is it necessary to quit chai on your fat loss journey know from dietician sjr

चहा पिण्याची सवय बंद केल्यास वजन झटपट होते कमी? डॉक्टर काय सांगतात, वाचा

Chai and weight loss : खरचं चहा पिणे बंद केल्याने वजन कमी होते का? याविषयी आहारतज्ज्ञांचे काय मत आहे जाणून घेऊ

February 24, 2024 16:29 IST
Follow Us
  • tea in weight loss diet is it necessary to quit chai on your fat loss journey know from dietician
    1/10

    भारतातील अनेकांची आनंदी आणि उत्साही सकाळ चहा प्यायल्यानंतर सुरू होते. परंतु, चहामुळे वजन वाढते असे अनेकदा म्हटले जाते. त्यामुळे जेव्हा कधी वजन कमी करण्याचा विचार येतो, तेव्हा बरेच जण पारंपरिक दुधाचा चहा बंद करतात. पण, खरंच वजन कमी करताना चहा पिण्याची सवय बंद करणे गरजेचे असते का? याच विषयावर पुढे आपण जाणून घेऊ… (photo – freepik)

  • 2/10

    याविषयी हेल्थ इन्फ्लुएंसर शुभी शिवहरे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू असताना चहा पिण्याची सवय बंद करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. पण, खरंच यामुळे वजन कमी होते का? याविषयी अहमदाबादमधील झायडस हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ श्रृती भारद्वाज यांनी इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर माहिती दिली आहे.(photo – freepik)

  • 3/10

    शिवहरे यांच्या मते गाय, म्हैस या जनावरांच्या १०० मिली दुधात सुमारे 50-60 kcal असते, तर एक चमचा साखरेत (४.३ ग्रॅम) 16 kcal असते. याचा अर्थ एक कप चहामध्ये अंदाजे 100-110 kcal असते. यामुळे फॅट कसे कमी होणार? असा प्रश्न आहे. (photo – freepik)

  • 4/10

    तुम्ही चहामध्ये अनावश्यक पांढरी साखर तर टाकताच, शिवाय त्याबरोबर रस्क, बिस्किटे, खारी, पकोडे यांसारखे स्नॅक्स खाता. याचा अर्थ, तुमचा दैनंदिन कॅलरी भत्ता आणि तुमच्या आरोग्याच्या समस्यांच्या आधारे दिवसभरात दोन लहान कप चहा पिणे पूर्णपणे स्वीकार्य आहे, पण यात कॅफीनचे प्रमाण कमी असले पाहिजे.(photo – freepik)

  • 5/10

    आहारतज्ज्ञ श्रृती भारद्वाज यांच्या मते, जर कोणी वजन कमी करण्याचा विचार करत असेल तर नेहमी चहाचे सेवन कमी करण्याची शिफारस केली जाते. कारण त्यात कॅलरीज असतात, टॅनिन असते जे लोह आणि काही खनिजांच्या शोषणात अडथळा निर्माण करतात. (photo – freepik)

  • 6/10

    मुख्य जेवणासह चहा पिणे टाळले पाहिजे. जेवण्यापूर्वी आणि जेवणानंतर एक ते दोन तासांचे अंतर राखल्यानंतरच चहा घ्या. जर एका दिवसात तुम्ही दुधाच्या चहाचे सेवन जास्त प्रमाणात करत असाल तर काही कप ग्रीन टी किंवा ब्लॅक टी प्यायली पाहिजे. (photo – freepik)

  • 7/10

    शिवहरे यांच्याप्रमाणेच भारद्वाज यांनीही साखरेचे सेवन मर्यादित करण्याचा सल्ला दिला आहे. गुळ किंवा साखरेमध्ये जवळजवळ समान कॅलरीज असतात, म्हणून त्यांचे सेवन मर्यादित करण्याची शिफारस केली जाते. याऐवजी तुम्ही ब्राऊन शुगर निवडू शकता, असेही भारद्वाज म्हणाल्या. (photo – freepik)

  • 8/10

    याच विषयावर हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन आणि डायबेटोलॉजी डॉ. सोमनाथ गुप्ता यांनी सांगितले की, साखरेचे प्रमाणात सेवन केल्यास तुम्हाला लालसेवर नियंत्रण ठेवता येते आणि रक्तातील साखरेची पातळीदेखील मर्यादित ठेवता येते, ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते. (photo – freepik)

  • 9/10

    याशिवाय संपूर्ण दूध किंवा मलई घालून बनवलेल्या चहामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असू शकतात. त्यामुळे चहाचे सेवन बंद करत तुम्ही तुमच्या आहारातून हे उच्च चरबीयुक्त घटक काढून टाकू शकता, यामुळे वजन कमी करण्यास आणि संपूर्ण हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते, असे डॉ. गुप्ता म्हणाले. याच विषयावर हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन आणि डायबेटोलॉजी डॉ. सोमनाथ गुप्ता यांनी सांगितले की, साखरेचे प्रमाणात सेवन केल्यास तुम्हाला लालसेवर नियंत्रण ठेवता येते आणि रक्तातील साखरेची पातळीदेखील मर्यादित ठेवता येते, ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते. (photo – freepik)

  • 10/10

    अतिरिक्त कॅलरी न जोडता हायड्रेट राहण्यासाठी चहाच्या जागी तुम्ही पाणी किंवा इतर कमी कॅलरी असलेली पेये निवडू शकता, असेही डॉ. गुप्ता यांनी नमूद केले. याशिवाय संपूर्ण दूध किंवा मलई घालून बनवलेल्या चहामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असू शकतात. त्यामुळे चहाचे सेवन बंद करत तुम्ही तुमच्या आहारातून हे उच्च चरबीयुक्त घटक काढून टाकू शकता, यामुळे वजन कमी करण्यास आणि संपूर्ण हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते, असे डॉ. गुप्ता म्हणाले. याच विषयावर डायबेटोलॉजी डॉ. सोमनाथ गुप्ता यांनी सांगितले की, साखरेचे प्रमाणात सेवन केल्यास तुम्हाला लालसेवर नियंत्रण ठेवता येते आणि रक्तातील साखरेची पातळीदेखील मर्यादित ठेवता येते, ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते. (photo – freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Tea in weight loss diet is it necessary to quit chai on your fat loss journey know from dietician sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.