-
लहान मुलांना जेवायला देणं किंवा खायला घालणं म्हणजे आई-वडिलांसमोर मोठा टास्कच असतो. मुलांच्या जेवणाची वेळ झाली की आई-वडिलांना त्यांना भरवायचं कसं हे टेन्शन येतं. (Photo: Freepik)
-
मुलांचा हट्टीपणा पाहून पालकही त्यांना टीव्ही किंवा मोबाईल देतात. जर तुम्हीही तुमच्या मुलाच्या या सवयीमुळे हैराण असाल आणि ती बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर या टिप्स नक्की फॉलो करा.(Photo: Freepik)
-
मुलांना एकटं जेवायला आवडत नाही त्यामुळे त्यांना टीव्ही पाहताना खाण्याची सवय लागते. ही सवय सोडवण्यासाठी मुलांना सोबतच जेवण्याची सवय लावा. मोठ्यांना पाहून मुले खूप लवकर शिकतात. टीव्ही न पाहताही ते सहज जेवण करतात.(Photo: Freepik)
-
तुमच्या मुलाला तेच अन्न द्या जे कुटुंबातील इतर सदस्य खातात किंवा तुम्ही खात आहात. यामुळे त्यांना कुटुंबातील इतर सदस्यांसोबत सहजपणे जेवण करण्याची सवय लागण्यास मदत होईल. मुलाला जबरदस्तीने खायला घालण्याचा प्रयत्न करू नका.मुलाला त्याची भूक आणि आहार ओळखण्याची संधी द्या.(Photo: Freepik)
-
अनेक वेळा टीव्ही पाहताना मुलांना जेवायला आवडत नाही, अशा परिस्थितीत पालक त्यांना जबरदस्तीने खायला घालू लागतात, त्यामुळे मुले हट्टी होऊ शकतात.(Photo: Freepik)
-
जर तुम्हाला तुमच्या मुलाने त्याच्या ताटातील संपूर्ण अन्न संपवल्यानंतरच उठवायचे असेल, तर पहिली टीप तुमच्यासाठी आहे की मुलाच्या आवडीचे जेवण बनवा. (Photo: Freepik)
-
पिझ्झामध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ आणि हिरव्या भाज्या वापरून तुम्ही हेल्दी बनवू शकता. कोणतेही मूल त्याच्या आवडत्या डिश खाण्यास नकार देणार नाही.(Photo: Freepik)
-
अनेकदा असे दिसून येते की पालक आपल्या मुलाला जास्त खाऊ घालतात. त्यामुळे मुले लठ्ठ होऊ लागतात. मुलाच्या वयानुसार आहाराचे प्रमाण नेहमी ठरवावे. (Photo: Freepik)
-
ताटात दररोज पोळी पाहून तुमच्या मुलाला कंटाळा येऊ शकतो. अशा परिस्थितीत पोळी ऐवजी तुम्ही मुलांच्या ताटात हार्ट, स्माइली, स्टार अशा वेगवेगळ्या आकाराचे पराठे देऊ शकता.(Photo: Freepik)
मुलं जेवताना फार चिडचिड करतात? मग ‘या’ खास टिप्स वापरुन मिळवा रागावर नियंत्रण
मुलांचा हट्टीपणा पाहून पालकही त्यांना टीव्ही किंवा मोबाईल देतात. जर तुम्हीही तुमच्या मुलाच्या या सवयीमुळे हैराण
Web Title: Parenting tips ways to teach kids to finish meal follow these simple tips srk