-
भारतातील अनेक भागांमध्ये स्वयंपाकासाठी मोहरीचे तेल वापरले जाते. विशेषतः उत्तर भारतात अनेक पदार्थ याच तेलाचा वापर करून बनवले जातात.
-
मात्र, उग्र वासाचे हे तेल आपल्या आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? आज आपण मोहरीच्या तेलाचे काही फायदे-तोटे जाणून घेऊया.
-
मोहरीच्या तेलाचा स्मोक पॉइंट उच्च असल्याने हे तेल कोणताही पदार्थ तळण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी अतिशय योग्य मानले जाते.
-
या तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असल्याने ते खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका टाळता येतो.
-
हे तेल मेंदूच्या आरोग्यास चालना देणाऱ्या ओमेगा -3 फॅटी अॅसिडचा समृद्ध स्त्रोत आहे.
-
अँटिऑक्सिडंट्सने भरपूर मोहरीचे तेल आपल्या शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवण्यास, जुनाट आजार कमी करण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यात मदत करते.
-
या तेलाची विशिष्ट चव असल्याने हे तेल पदार्थाला एक वेगळी चव प्रदान करते.
-
मोहरीच्या तेलामधील नैसर्गिक गुणधर्मामुळे याचे नियमित सेवन केल्यास आतडे निरोगी राखण्यास मदत होऊ शकते. हे पचन समस्या दूर करण्यास देखील मदत करू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Freepik)
उग्र वासाचे मोहरीचे तेल आरोग्यासाठी खरंच गुणकारी? ‘या’ फायद्यांसाठी करावा आहारात समावेश
भारतातील अनेक भागांमध्ये स्वयंपाकासाठी मोहरीचे तेल वापरले जाते. विशेषतः उत्तर भारतात अनेक पदार्थ याच तेलाचा वापर करून बनवले जातात.
Web Title: Is mustard oil really good for health it should be included in the diet for these benefits pvp