-
Skin Care Tips Holi 2024: रंगांचा सण होळी, कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत अतिशय उत्साहात साजरा केला जातो. स्वादिष्ट मिठाई, आकर्षक रंग आणि पाण्याची फुग्यांची मौजमजा अशी रेलचेल घेऊन होळी लवकरच येतेय. (Photo: Freepik)
-
पण काही लोक विशेषतः मुलींना त्यांच्या त्वचेची जास्त काळजी असते. होळीला चेहऱ्यावर रंग लावल्यामुळे अनेक वेळा अॅलर्जी आणि लालसरपणा येतो. रंगांमध्ये असलेले केमिकल्स त्वचेसाठीच नव्हे तर केसांसाठीही हानिकारक असतात. (Photo: Freepik)
-
या सणासुदीच्या काळात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्ही फॉलो करू शकता. त्यामुळे होळी खेळताना त्वचेला इजा होण्याची भीती राहणार नाही. (Photo: Freepik)
-
बदामाचे तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. होळी खेळण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेला बदामाचे तेल लावू शकता. बदामाचे तेल हे व्हिटॅमिन ईचा समृद्ध स्रोत आहे. हे तेल त्वचेवर संरक्षणात्मक थर बनवते जेणेकरून रंग त्वचेला हानी पोहोचवू शकत नाहीत. (Photo: Freepik)
-
बदामाच्या तेलाप्रमाणे नारळाचे तेलही त्वचेसाठी चांगले असते. होळी खेळण्यापूर्वी खोबरेल तेल नीट लावा. हे तेल त्वचेवर तसेच केसांना लावता येते. त्यामुळे केसांनाही इजा होत नाही.(Photo: Freepik)
-
होळी खेळताना आपण बाहेर उन्हात असतो. यामुळे सन टॅनिंगही वाढते. अशा स्थितीत चेहरा आणि शरीरावर सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. (Photo: Freepik)
-
होळीला काही दिवस असले तरी आजपासूनच चेहऱ्यावर टोनर लावायला सुरुवात करावी. टोनर लावल्याने त्वचेची मोठी छिद्रे लहान होऊ लागतात. (Photo: Freepik)
-
याशिवाय होळीच्या दिवशी पूर्ण झाकलेले कपडे घाला. तसेच घट्ट कपडे घालणं टाळा. होळी खेळण्यासाठी फक्त नैसर्गिक रंग वापरा. हे रंग सहज काढता येतात.(Photo: Freepik)
-
यंदाच्या होळीत तुम्ही जर हे उपाय केले तर तुम्ही होळी मनसोक्तही खेळू शकता आणि तुमच्या त्वचेची काळजी देखील घेऊ शकता. (Photo: Freepik)
होळीचा उत्साह भारी, पण त्वचेचं काय? त्वचेची अशी घ्या काळजी; फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
Pre Holi Skin Care: Holi 2024 : होळीचा उत्साह भारी, पण त्वचेचं काय? या सणासुदीच्या काळात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्ही फॉलो करू शकता. त्यामुळे होळी खेळताना त्वचेला इजा होण्याची भीती राहणार नाही.
Web Title: Holi 2024 holi skincare routine essential tips for holi to avoid skin and hair damage srk