• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. can milk tea cause weight gain simple change in chai recipe helps diabetic patient control blood sugar benefits of black chai svs

दुधाचा चहा खरंच वजन वाढवतो का? चहामध्ये ‘हा’ बदल केल्यास रक्तातील साखर कमी करण्यात होऊ शकते मदत

Benefits Of Tea: कोरा चहा प्यावा की दुधाचा? या वर्षानुवर्षे चर्चेत असणाऱ्या प्रश्नाविषयी अलीकडे झालेल्या एका अभ्यासात महत्त्वाचा खुलासा झाला आहे. आपल्यासाठी नेमका कोणता चहा योग्य ठरेल व दिवसातून किती वेळा हा चहा घ्यावा , हे जाणून घेऊया..

March 18, 2024 20:00 IST
Follow Us
  • Can Milk Tea Cause Weight Gain Simple Change In Chai Recipe Helps Diabetic Patient Control Blood Sugar Benefits Of Black Chai
    1/9

    दुधाचा चहा प्यायल्याने किंवा दूध टाकून चहा खूप वेळ उकळल्याने ऍसिडिटी होण्याची शक्यता अधिक असते असा एक समज आहे. याऐवजी कोरा चहा पिणं हा त्यातल्या त्यात सोपा व फायदेशीर पर्याय मानला जातो. यात काही तथ्य आहे का व कोऱ्या चहाचे स्वतंत्र काही फायदे आहेत का, हे पाहूया..

  • 2/9

    अलीकडेच झालेल्या अभ्यासात, ऑस्ट्रेलियातील अॅडलेड विद्यापीठ आणि चीनमधील साउथईस्ट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळून आले की दररोज कोरा चहा पिणाऱ्यांमध्ये प्री-डायबिटीजचा धोका ५३ टक्के कमी असतो तर टाइप २ मधुमेहाचा धोका ४७ टक्के कमी होतो.

  • 3/9

    अॅडलेड विद्यापीठातील अभ्यासक टोंगझी वू यांनी या अभ्यासाबाबत निरीक्षण नोंदवताना सांगितले की, “कार्डिओव्हॅस्क्युलर व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करण्यात कोरा चहा उपयुक्त ठरू शकतो

  • 4/9

    कोरा चहा प्यायल्याने लघवीमधून वाढलेल्या ग्लुकोजचे उत्सर्जन होत असावे आणि म्हणून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते असा अंदाज टोंगझी वू यांनी व्यक्त केला आहे

  • 5/9

    कोऱ्या चहाचा आणखी एक फायदा म्हणजे यामुळे पचनाचा वेग वाढण्यास मदत होते. तसेच कोऱ्या चहामधील दाहकविरोधी गुणधर्मामुळे स्वादुपिंडातील व आतड्यांच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते

  • 6/9

    दुधाच्या चहामुळे वजन वाढत असल्याची सुद्धा अनेकदा चर्चा होते. पण सोप्या शब्दात सांगायचं तर दुधापेक्षा किंवा चहा पावडरपेक्षा चहातील सर्वात घातक पदार्थ ठरतो, साखर. साखरेवर नियंत्रण ठेवल्यास दुधाच्या चहाचा वजनावर अगदी वाईट परिणाम होण्याची शक्यता कमी असते.

  • 7/9

    तज्ज्ञ डॉक्टर असेही सुचवतात की, चहाबरोबर आपण काय खातो हे सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. शक्यतो, अधिक गोड, क्रिमी बिस्कीट, टोस्ट घेणे टाळावे. यामुळे रक्तातील साखर बूस्ट होण्याची शक्यता असते.

  • 8/9

    दिवसातून दोन वेळा कमी साखरेचा व दुधाचा चहा घेणे साधारणतः शरीराला साजेसे ठरू शकते. यापेक्षा जास्त प्रमाण हे पित्त व ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते

  • 9/9

    दरम्यान, वरील फायदे लक्षात घेता आपणही दुधाच्या चहाऐवजी कोरा चहा पिण्याचा आरोग्यदायी बदल करून पाहू शकता. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Can milk tea cause weight gain simple change in chai recipe helps diabetic patient control blood sugar benefits of black chai svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.