• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to treat back acne at home use few simple and easy home remedies for problem check out this amazing tips dha

Back acne घालवण्याचे सोपे घरगुती उपाय! काय करावे, काय नको जाणून घ्या ‘या’ टिप्स….

अनेकांना बाराही महिने पाठीवर बारीक-बारीक पुरळ म्हणजेच बॅक ऍक्ने असते. मात्र या पुरळाचा त्रास कमी करण्यासाठी काही अत्यंत सोपे असे घरगुती उपाय करता येऊ शकतात, ते पाहा.

March 18, 2024 21:49 IST
Follow Us
  • simple tips to get rid of back acne
    1/9

    Body acne home remedy tips : उन्हाळ्यात अनेकांच्या हातावर, मानेवर किंवा पाठीवर पुरळाचा उठते. अनेकदा ते वातावरणाशी संबंधीत असू शकते. परंतु काहींना कायम बाराही महीने, पाठीवर आणि खांद्यावर पुरळ उठलेले असते. यालाच आपण ‘बॉडी ऍक्ने’ म्हणतो. हे शक्यतो घाम, तेलकट त्वचा, पाठीवरील मृत त्वचा यामुळे येऊ शकते अशी माहिती इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील click4su नावाच्या अकाउंटने दिली आहे.[Photo credit – Freepik]

  • 2/9

    मात्र हे ऍक्ने घालवण्यासाठी काही अतिशय सोपे असे घरगुती उपाय आहेत. दैनंदिन जीवनातील काही सवयी बदलून, काही नवीन सवयी लावूनही समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. click4su ने बॉडी ऍक्ने कमी [Photo credit – Freepik]करण्यासाठी नेमके कोणते घरगुती उपाय सांगितले आहेत ते पाहू.[Photo credit – Freepik]

  • 3/9

    १. आंघोळीसाठी कडक गरम पाणी वापरण्याची अनेकांना सवय असते. पाठीवर पुरळ येण्याचे ते एक कारण असू शकते. त्यामुळे शक्यतो कडक गरम पाण्याऐवजी आंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे.[Photo credit – Freepik]

  • 4/9

    २. आठवड्यातील एक किंवा दिन दिवस अंघोळीदरम्यान शरीरावरील मृत त्वचा काढण्यासाठी चांगल्या किंवा घरगुती स्क्रबचा वापर करू शकता. घरगुती स्क्रब बनवण्यासाठी तुम्ही मध, साखर कॉफी यांचा वापर करू शकता.[Photo credit – Freepik]

  • 5/9

    ३. अंघोळीदरम्यान केसांवर शाम्पू आणि कंडिशनरचा वापर केल्यानंतर, एखाद्या चांगल्या बॉडीवॉशचा वापर मान आणि पाठ यांवर करावा.[Photo credit – Freepik]

  • 6/9

    ४. तुम्ही झोपता त्या पलंगावरील चादर तसेच उशीचा अभ्रा / कव्हर दर आठवड्याला बदलावा. झोपताना कायम स्वच्छ उशी, पांघरूण आणि चादर यांचा वापर करावा.[Photo credit – Freepik]

  • 7/9

    ५. तुम्हाला जर केस मानेवर-पाठीवर मोकळे सोडायची सवय असेल, तर तसे करू नका. त्याऐवजी केसांचा छान आंबाडा किंवा बन बांधून ठेवावा. तुम्ही दररीज व्यायाम करत असाल, तर व्यायामानंतर आंघोळ करावी. तसेच अंगाला चिकटून बसणारे किंवा सॅटिनचे कपडे घालणे टाळावे.[Photo credit – Freepik]

  • 8/9

    ६. पाठीवर पुरळ असल्यास हलके मॉइश्चराइजर आणि ऑइल फ्री सनस्क्रीनचा वापर करावा. तसेच सुती आणि सुटसुटीत कपड्यांचा वापर करावा. सर्वात शेवटी, जर तुम्हाला ‘बॅक ऍक्ने’ म्हणजेच पाठीवरील पुरळाचा खूपच त्रास होत असेल तर, त्वचा डॉक्टरांना [डर्मेटोलॉजिस्ट] दाखवून यावे.[Photo credit – Freepik]

  • 9/9

    ७. पाठीवरील पुरळ कमी करण्यासाठी कोरफड, काकडीचा रस, गुलाब पाणी किंवा कडुनिंबाच्या पानांचा वापरदेखील करता येऊ शकतो. [टीप – वरील टिप्स या प्राप्त माहितीवर आधारित आहे. कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.] [Photo credit – Freepik]

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksब्यूटी टिप्सBeauty Tipsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsस्कीन केअर टिप्सSkin Care Tips

Web Title: How to treat back acne at home use few simple and easy home remedies for problem check out this amazing tips dha

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.