-
अध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव यांची कन्या राधा जग्गी यांनी ती शेअर करत ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा अपडेट दिला आहे.
-
१७ मार्च या दिवशी त्यांना दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंत डॉ. विनीत सुरी यांनी त्यांची तपासणी केली आणि एमआरआय करण्याचा सल्ला दिला. एमआरआयच्या अहवालात त्यांच्या मेंदूला सूज आल्याचं आणि रक्तस्त्राव झाल्याचं आढळलं होतं. ज्यानंतर ही शस्त्रक्रिया पार पडली आहे.
-
सद्य अपडेटनुसार, शस्त्रक्रियेनंतर सद्गुरु यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही काढण्यात आला असून त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. नरसिंहन यांच्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर त्यांचा मेंदू, शरीर आणि महत्त्वाच्या पॅरामीटर्समध्ये चांगल्या सुधारणा होत आहेत
-
सदगुरु यांची प्रकृती सध्या सुधारली असली तरी अचानक झालेला हा त्रास कशामुळे उद्भवला. आपल्याला हा त्रास होऊ शकतो का, हा आजार असेल तर तो ओळखायचा कसा हे प्रश्न अनेकांना पडत आहेत. आज आपण या ब्रेन ब्लीडबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
-
सद्गुरू यांना झालेला त्रास म्हणजे मेंदूतील रक्तस्राव, ज्याला इंट्राक्रॅनियल हॅमरेज असेही म्हणतात हा एक प्रकारचा स्ट्रोक आहे. रक्तवाहिनी फुटल्यामुळे मेंदू आणि कवटीच्या मधल्या भागात रक्त साचून घट्ट होऊ लागते. यामुळे तुमच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा बंद होतो
-
क्लिव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, मेंदूतील रक्तस्त्रावामागे विविध कारणे आहेत. जसे की, डोक्याला गंभीर दुखापत होणे. रक्तवाहिन्यांमध्ये फॅटी ऍसिड जमा होणे किंवा मेंदूच्या धमन्यांदरम्यान प्रथिनांचे थर तयार होणे, रक्तवाहिन्या कमकुवत होणे
-
आरोग्य समस्या जसे की उच्च रक्तदाब, चिंता, तणाव, अंमली पदार्थांचे सेवन, तंबाखूचे सेवन, गर्भधारणा, इत्यादी दम्यान अशा प्रकारची स्थिती उद्भवण्याचा धोका निर्माण होतो
-
मेंदूतील रक्तस्रावाची लक्षणे: तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा किंवा अंग सुन्न होणे, चेहऱ्याच्या काही भागाला अर्धांगवायूचा झटका येणे, मळमळ आणि उलटी, बोलताना अडथळा येणे, चक्कर येणे, गिळण्यास त्रास होणे, दृष्टी कमी होणे, प्रकाशाचा त्रास होणे व संतुलन गमावणे
-
वेळीच उपचार न केल्यास आजाराच्या प्रगत टप्यात रुग्ण कोमात सुद्धा जाऊ शकतो.(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/इंस्टाग्राम)
सद्गुरुंच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव; कशामुळे उद्भवते ही स्थिती? धोका कसा ओळखावा, शरीर देत असते हे संकेत
What Happened To Sadhguru: अध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मेंदुवर तातडीने शस्त्रक्रिया झाल्याची माहिती सद्गुरू यांची कन्या राधा जग्गी यांनी शेअर केली आहे.या आजाराची लक्षणे व धोका कसा ओळखावा हे पाहूया..
Web Title: Sadhguru brain bleeding causes signs of symptoms of brain tumor look out these changes in body health update on jaggi vasudev svs