• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. science behind why mangoes should be soaked in water before eating sjr

आंबा खाण्याआधी पाण्यात का भिजवला जातो? काय आहेत त्याचे तोटे, जाणून घ्या

Why should you soak mangoes in water before eating : अनेकजण आंबा आवडीने खातात. मात्र तो खाण्याआधी स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे.

March 22, 2024 06:50 IST
Follow Us
  • Science Behind why mangoes should be soaked in water before eating
    1/12

    उन्हाळ्यासोबत आता आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. उन्हाळ्यात चवदार, स्वादिष्ट आंबा खाण्याची एक वेगळीच मजा असते. आंबा हे असे फळ आवडत नाही असे फार कमी जण असतील. (photo – freepik)

  • 2/12

    आंब्याच्या मधुर गोड चवीमुळे खाताना एक मनशांती मिळते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आंबा खायला आवडतो. (photo – freepik)

  • 3/12

    यात वृद्ध आजी, आई अनेकदा आंबा पाण्यात भिजवून मग खा असे सांगताना दिसतात. पण आंबा पाण्यात भिजवूनच का खाल्ला पाहिजे? यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? हे आपण जाणून घेऊ (photo – unsplash)

  • 4/12

    लहानपणापासून आंबा खाण्यापूर्वी आई, वडील पाण्यात काहीवेळ भिजवत ठेवून मग आपल्याला खायला देताना पाहिल असेल. पण आंबा खाण्यापूर्वी भिजवण्यामागे केवळ रसायने, घाण आणि धूळ काढणे एवढाच उद्देश नसतो. तो धुवून न घेतल्यास त्याची गुणवत्ता आणि चवही खराब लागते. (photo – unsplash)

  • 5/12

    आंब्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात जे शरीराच्या कार्यावर परिणाम करतात. यात आंब्यात फार उष्णता असते आणि उन्हाळ्यातील उष्णतेत तुम्ही आंबे खाता तेव्हा तुमच्या शरीरातही उष्णता वाढते. (photo – unsplash)

  • 6/12

    ज्यामुळे पचनसंस्था आणि आतड्यांवर परिणाम होऊ शकतो. पण आंबे भिजवल्याने त्यातील उष्णता कमी होण्यास मदत होते, तसेच बद्धकोष्ठता, त्वचेच्या समस्या, डोकेदुखी आणि जुलाब यांसारख्या समस्याही बऱ्याच प्रमाणात कमी होतात. त्यामुळे आंबा अर्धा तास पाण्यात भिजवल्यास थर्मोजेनिक गुणधर्मही कमी होतात. (photo – unsplash)

  • 7/12

    तसेच बद्धकोष्ठता, त्वचेच्या समस्या, डोकेदुखी आणि जुलाब यांसारख्या समस्याही बऱ्याच प्रमाणात कमी होतात. त्यामुळे आंबा अर्धा तास पाण्यात भिजवल्यास थर्मोजेनिक गुणधर्मही कमी होतात. (photo – freepik)

  • 8/12

    कीटक, तण आणि विविध जंतूंपासून आंब्याच्या झाडाचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशके आणि रसायनांची फवारणी केली जाते, (photo – unsplash)

  • 9/12

    कारण कीटकनाशकांमुळे त्वचेची जळजळ, मळमळ, श्वसनमार्गात जळजळ, ऍलर्जी, कर्करोग आणि डोकेदुखी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.(photo – unsplash)

  • 10/12

    या रसायनांचा आपल्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. (photo – freepik)

  • 11/12

    आंबा भिजवून ठेवल्याने त्याच्या देटावरील चिटकपणा निघून जातो. आंब्याच्या देठावर पांढऱ्या रंगाचा एक चिकट पदार्थ बाहेर येतो ज्यामध्ये फायटिक एॅसिड असते, यामुळे आंब्याची चव वेगळी लागते. (photo – unsplash)

  • 12/12

    आंबे पाण्यात साधारण १५ ते २० मिनिटे भिजवून खावे. यामुळे आंब्यातील उष्णता कमी होते. जर आंबा न भिजवताच खाल्ला तर पोटाचे विकार वाढू शकतात. (photo – unsplash)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Science behind why mangoes should be soaked in water before eating sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.