Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. summer skin care diy hacks how to get rid of body odour smell of sweat try these natural home remedies right now sjr

उन्हाळ्यात खूप घाम येत असेल तर अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ पदार्थ; दिवसभर रहाल फ्रेश

Summer Skin Care : उन्हाळ्यात एक गोष्ट खूप त्रासदायक असते, ती म्हणजे घाम. घामटलेल्या अवस्थेत इतरांसमोर जातानाही लाजिरवाणे वाटते. अशा वेळी खालील घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

March 23, 2024 18:59 IST
Follow Us
  • summer skin care diy hacks how to get rid of body odour smell of sweat try these natural home remedies right now
    1/11

    उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे खूप चिडचिड होते. या दिवसांत न सोसवणारा सूर्यप्रकाश, धूळ आणि घामामुळे दुपारी घराबाहेर पडण्याची इच्छा होत नाही. (photo – freepik)

  • 2/11

    यात बाहेर पडल्यानंतर शरीरातून वाहणाऱ्या घामाच्या धारांमुळे अजिबात फ्रेश वाटत नाही, कामात पटकन लक्ष लागत नाही. उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर सारखी अंघोळ करावीशी वाटते. (photo – freepik)

  • 3/11

    अंघोळ केल्याने उष्णतेपासून आराम मिळतोच, पण त्यामुळे शरीरात साचलेला घाम, बॅक्टेरिया आणि जंतूंपासून सुटका होते. सकाळी अंघोळ केल्यानंतर दिवसभर फ्रेश वाटावे असे प्रत्येकाला वाटते. (photo – pexels)

  • 4/11

    पण दुपारी घाम येतो. अशा परिस्थितीत घामामुळे अंग चिकट होते आणि खूप दुर्गंधी येते. मात्र या समस्येपासून सुटका करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्स देणार आहोत. त्या फॉलो करून तुम्ही दिवसभर फ्रेश राहू शकता. (photo – freepik)

  • 5/11

    तुम्ही अंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळून अंघोळ करू शकता. यामुळे तुम्हाला फ्रेश तर वाटेलच त्या सोबत खाज येणे, घाम येणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळवू शकता. चला तर मग ते कोणते पदार्थ आहेत आहेत जाणून घेऊ… (photo – freepik)

  • 6/11

    कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेचे वेगवेगळ्या बॅक्टेरियांपासून संरक्षण करतात. उन्हाळ्यात तुम्ही अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने किंवा कडुलिंबाचे तेल मिसळून अंघोळ करू शकता. (फोटो – indian express)

  • 7/11

    ज्यामुळे त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे, मुरूम इत्यादी समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटू शकते. (photo – pixabay)

  • 8/11

    हळदीमध्येही अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-एजिंगसारखे अनेक गुणधर्म असतात. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. (photo – freepik)

  • 9/11

    उन्हाळ्यात हळद पाण्यात मिसळून अंघोळ केल्यास त्वचेवरील पिंपल्स, रॅशेसपासून आराम मिळू शकतो, शिवाय त्वचा चमकदार होण्यास मदत होते आणि टॅनिंग कमी होते. (photo – freepik)

  • 10/11

    अंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून अंघोळ केल्यास दिवसभर ताजेतवाने वाटू शकते.(photo – freepik)

  • 11/11

    मानसिकदृष्ट्यादेखील तुम्ही फ्रेश राहून काम करू शकता. याशिवाय तुमचा मूडही दिवसभर चांगला राहील. तसेच त्वचा ताजी राहते आणि घामामुळे येणारी दुर्गंधीही कमी होण्यास मदत होते. (photo – freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Summer skin care diy hacks how to get rid of body odour smell of sweat try these natural home remedies right now sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.