-
पोट साफ तो सर्वसुखी, असं म्हणतात, ज्यांना आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे किंवा अन्य कोणत्या कारणाने हे भाग्य लागत नाही त्यांना तर हे पूर्णपणे पटेल. पण तुम्हालाही असं सर्वसुखी व्हायचं असेल तर सकाळी उठताच १० ते १५ मिनिटांत खालील कृती करून तुम्ही पोट स्वच्छ करण्यासाठी मेहनत घेऊ शकता. @wellnesswithmanisha या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या काही खास टिप्स पाहूया.
-
मलासनात बसून आपण कोमट पाणी प्यायचे आहे. काही वेळ याच स्थितीत राहून मग पुढच्या आसनांकडे वळायचे आहे
-
दुसरं आसन म्हणजे ताडासन. आपल्याला दोन्ही हात कानापासून सरळ वरच्या दिशेने न्यायचे आहेत व पायाच्या टाचा उंचावायच्या आहेत. शरीर वरच्या बाजूने काही प्रमाणात ताणले जाईल असे पाहा
-
तिसरं आसनं करण्यासाठी आधीच्या स्थितीतच हात ठेवून एक एक करून डाव्या व उजव्या बाजूला खाली वाकायचे आहे
-
चौथ्या आसनासाठी हात खाली घेऊन आपल्याला कंबरेतून डाव्या व उजव्या बाजूला वळायचे आहे.
-
या आसनात आपल्याला पुन्हा मलासनात येऊन एक एक करून डावे व उजवे ढोपर विरुद्ध दिशेला जमिनीला टेकवायचे आहे.
-
प्रत्येक आसन हे किमान ५ ते ७ वेळा करायचे आहे. साधारण १०-१५ मिनिटात तुम्ही ही आसने करू शकता.
-
योग अभ्यासक मनीषा यादव यांनी वरील आसने करण्याआधी साधारण २५० मिली कोमट पाणी प्यायचे आहे असेही सांगितले आहे.
-
लक्षात घ्या बद्धकोष्ठतेची समस्या दीर्घकाळ असल्यास, ती दूर होण्यास थोडा वेळ लागू शकतो. वरील आसनांचा रोज सराव करत राहिल्यास व त्याबरोबरीने संतुलित आहार घेतल्यास काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.
सकाळी कोमट पाणी किती प्रमाणात प्यावं? झोपेतून उठताच १५ मिनीटांत ‘या’ पाच हालचाली कराल तर पोट होईल स्वच्छ
Constipation Remedies: सकाळी उठताच कोमट पाणी प्यावे हे आजवर अनेकांनी सांगितले असेल पण त्याचे नेमके प्रमाण किती हवे? पाणी प्यायल्यावर काय केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. याचे सोपे उत्तर आपण आज पाहूया..
Web Title: 15 minutes routine to make stomach clean intestine will pass poop easily how much warm water is okay to drink after waking up svs