-
बहुतेकवेळा गाजराचा वापर आपण कोशिंबीर, सॅलड किंवा सूपमध्ये करत असतो. मात्र या काही निवडक पदार्थांपेक्षा अजून चटपटीत आणि बराचकाळ टिकून राहणारी गोष्ट आपण या गाजरांचा वापर करून बनवू शकतो. [Photo credit – Freepik]
-
ती गोष्ट म्हणजे, गाजराचे लोणचे. आपल्या जेवणाला चटपटीत बनवणारेलोणचे बनवण्यास सोपे असून ते अधिककाळ टिकून राहते. गाजरापासून लोणचे बनवण्यासाठी अत्यंत सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @me_haay_foodie नावाच्या अकाउंटने शेअर केली आहे. आता ते कसे बनवायचे हे पाहा. [Photo credit – Freepik]
-
साहित्य – तेल १/२ कप, गाजर – २५० ग्रॅम, बडीशेप – १ चमचा, जिरे १/२ चमचा, मेथी दाणे १/४ चमचा, चिरलेले आले १ इंच, मोहरीचे दाणे २ चमचे, लाल तिखट १ चमचा, हळद १/४ चमचा, हिंग १/४ चमचा, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, २ चमचे, मीठ [Photo credit – Freepik]
-
सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून घेऊन त्यांना सोलाण्याच्या मदतीने सोलून घ्या. आता त्याचे बारीक फोडी चिरून एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यावर थोडे मीठ लावून बाजूला ठेवून द्या. [Photo credit – Freepik]
-
एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये बडीशेप, मेथी दाणे आणि जिरे घालून वाटून त्याची बारीक पावडर करून घ्या. आता एक लोखंडी किंवा कोणतीही कढई घेऊन त्यामध्ये तेल घालून त्याला व्यवस्थित तापू द्यावे. [Photo credit – Freepik]
-
तेल तापल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले आल्याचे तुकडे घालून परतून घ्यावे. त्यानंतर तेलात मोहरीचे दाणे, हिंग आणि मीठ लावलेल्या गाजराच्या फोडी घालून सर्व पदार्थ ढवळून घ्यावे. [Photo credit – Freepik]
-
आता यात मीठ, हळद, लाल तिखट आणि तयार केलेली बडीशेप, मेथी दाणे आणि जिरे यांची पावडर घालून घ्या. त्यासह लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालून सर्व पदार्थ छान ढवळून घ्यावे. सर्व पदार्थ काही मिनिटांसाठी मंद आचेवर ढवळून काही वेळाने कढईखालील गॅस बंद करून घ्यावा. [Photo credit – Freepik]
-
तयार लोणचे काचेच्या घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा. तयार आहे आपले चटपटीत आणि खमंग असे गाजराचे लोणचे. [Photo credit – Freepik]
घरच्याघरी स्वादिष्ट अन् चटपटीत लोणचे कसे बनवायचे? पाहा ही सोपी रेसिपी
बाजारात मिळणाऱ्या केशरी गाजरांपासून खमंग आणि चटपटीत लोणचे कसे बनवायचे त्याची सोपी रेसिपी पाहा.
Web Title: Basic and simple recipe of carrot pickle how to make it at home follow these simple steps dha