• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you know how mobile phone radiation affect mens fertility ndj

पुरुषांनो, सतत मोबाइल वापरल्यामुळे खरंच कायमस्वरूपी वंध्यत्व निर्माण होऊ शकते?

तरुण मुले तर मोबाइलच्या इतक्या आहारी गेली आहेत की, त्यांना मोबाइलशिवाय कोणतीही गोष्ट अशक्यच वाटते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, मोबाइलच्या अतिवापरामुळे आपल्या आरोग्यावर किती गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात?

March 27, 2024 20:40 IST
Follow Us
  • How Mobile Phone Radiation Affect Mens Fertility
    1/9

    मोबाइल आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातात मोबाइल असतो; मोबाइलशिवाय जगणे कठीण अशी अवस्था आहे. तरुण मुले तर मोबाइलच्या इतक्या आहारी गेली आहेत की, त्यांना मोबाइलशिवाय कोणतीही गोष्ट अशक्यच वाटते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, मोबाइलच्या अतिवापरामुळे आपल्या आरोग्यावर किती गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात? (Photo : Freepik)

  • 2/9

    २००६ मध्ये अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन (American Society for Reproductive Medicine) यांनी आपल्या अहवालात नमूद केलेले आहे की, मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे पुरुषांच्या शरीरातील वीर्याची गुणवत्ता घसरते. वीर्यामधील शुक्राणूंच्या संख्येत घट होते. शुक्राणूंची हालचाल मंदावते, मोबाइलचा अतिवापर करणाऱ्यांच्या वीर्यामध्ये ३० टक्के घट आढळून आलेली आहे. (Photo : Freepik)

  • 3/9

    १ मिलिलीटर सेमिनल फ्लूईडमध्ये साधारणत: ८३ दशलक्ष शुक्राणू आढळतात, मोबाइल फोनचा अतिवापर करणाऱ्यांमध्ये केवळ ५९ दशलक्ष किंवा त्यापेक्षा कमी शुक्राणू आढळतात. तसेच सेमिनल फ्ल्यूईडमध्ये शुक्राणूंची हालचाल करण्याचे प्रमाण मोबाइलचा अतिवापर करणाऱ्यांमध्ये केवळ ३६.३ टक्के असते; तर मोबाइल न वापरणाऱ्यांमध्ये हे प्रमाण ५१.३ टक्के असते (Photo : Freepik)

  • 4/9

    पुणे येथील इंदिरा आयव्हीएफ (Indira IVF) चे संचालक आयव्हीएफतज्ज्ञ डॉ. अमोल लुंकड या विषयी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला माहिती देताना सांगतात, “मोबाइलच्या रेडिएशन आणि उष्णतेमुळे पुरुषांच्या शुक्राणूंवर परिणाम होतो. शुक्राणूची हालचाल व आकार यावर त्याचा परिणाम दिसून येतो.” (Photo : Freepik)

  • 5/9

    तरुण पिढी मोबाइलचा अतिवापर करते आहे, त्यामुळे भविष्यात पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढू शकते का, या संदर्भात विचारले असता डॉ. लुंकड पुढे सांगतात, “गेल्या २५ ते ३० वर्षांपासून ही समस्या वाढतच आहे. आता शुक्राणूंची साधारण पातळी १५ दशलक्ष प्रति मिलिलीटर आहे, पण पूर्वी ती ४० दशलक्ष प्रति मिलिलीटर होती. आता ती संख्या कमी होत आहे. पुरुषांमध्ये दिवसेंदिवस वंध्यत्व वाढत आहे. आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये ५० टक्के पुरुषांमध्ये शुक्राणूंची मोठी समस्या असते. यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील मोबाइल रेडिएशन हे एक कारण आहे.” (Photo : Freepik)

  • 6/9

    युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या नॅशनल इन्स्टिस्टूट ऑफ हेल्थ (National Institutes of Health) म्हणजेच एनआयएच (NIH) संस्थेनी २०१४ मध्ये एका अभ्यासात सांगितले होते की मोबाइलच्या रेडिएशनचा थेट शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. या अभ्यासात ३२ निरोगी पुरुषांवर अभ्यास केला. प्रत्येक शुक्राणूचा नमुना दोन समान भागामध्ये ठेवण्यात आला. (Photo : Freepik)

  • 7/9

    एका थर्मोस्टॅटमध्ये पाच तासांसाठी शुक्राणूंचे नमुने ठेवण्यात आले तर दुसऱ्या थर्मोस्टॅटमध्ये सुद्धा पाच तासांसाठी शुक्राणूंचे नमुने ठेवण्यात आले. पण या थर्मोस्टॅटजवळ मोबाइल फोन ठेवण्यात आला होता. योग्यरित्या मूल्यांकन केल्यानंतर मोबाइल रेडिएशनमुळे दुसऱ्या थर्मोस्टॅटमधील शुक्राणूंची गतिशीलता कमी दिसून आली.” (Photo : Freepik)

  • 8/9

    या संदर्भात रेडिओलॉजिस्ट सल्लागार डॉ. नितीन काटकर यांचे मत जाणून घेतले. डॉ. नितीन काटकर लोकसत्ताशी बोलताना सांगतात, “मोबाइल हा खूप जास्त वापरला जातो, ज्याचा परिणाम शुक्राणूंवर दिसून येतोय. मोबाइलचा वापर टाळता येत नाही, पण त्याचा दुष्परिणाम समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे.मोबाइलशिवाय वायफाय, लॅपटॉप, टीव्ही, मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये जे रेडिएशन्स असतात, ते थेट पिट्युटरी ग्रंथीवर परिणाम करतात. या ग्रंथीत असणाऱ्या लेडिंग आणि सर्टोली पेशी ज्या अंडकोषातील सेमिनिफेरस ट्यूबल्सच्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये असतात. (Photo : Freepik)

  • 9/9

    डॉ. नितीन काटकर सांगतात, “या पेशी टेस्टोस्टेरोन हार्मोन तयार करतात. टेस्टोस्टेरोन हा शरीरातील महत्त्वाचा हार्मोन आहे.हा हार्मोन थेट लैंगिक क्षमतेची संबंधित आहे. रेडिएशन्सचा थेट परिणाम टेस्टोस्टेरोन हार्मोनवर होतो. जेव्हा टेस्टोस्टेरोनची पातळी कमी होते, तेव्हा शुक्राणूची गुणवत्ता आणि संख्येवर परिणाम होतो आणि पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होते.” (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Do you know how mobile phone radiation affect mens fertility ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.