-
नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला एक महिना लागतो. नवग्रहांमध्ये बुधाचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
-
बुध हा बुद्धिमत्ता, शिक्षण, ज्ञान, बुद्धी, वाणी, प्रतिभा इत्यादींचा कारक ग्रह आहे. आता बुधदेव २ एप्रिलला मेष राशीमध्ये वक्री होणार आहेत.
-
यानंतर ४ एप्रिलला बुधदेव अस्त होणार आहेत. बुधदेवाचे मेष राशीमध्ये वक्री आणि अस्त होणे काही राशींसाठी लाभदायी ठरु शकते. त्यांना आयुष्यात अपार यश, धन मिळण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी….
-
बुधदेवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.
-
बुधदेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला बढती आणि पगारवाढीची भेट मिळू शकते. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी काळ फलदायी ठरु शकते. प्रवासातून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो.
-
बुधदेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ आणि नोकरीत बढती मिळू शकते. या काळात बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकते. भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर यश आणि नफा मिळण्याची शक्यता आहे.
-
धनु राशीच्या लोकांना बुधदेवाच्या कृपेने धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात. या काळात तुम्हाला आकस्मिक पैसा मिळू शकतो.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो : सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
४ एप्रिलपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकता गडगंज श्रीमंत
Budh Rashi Parivartan: बुधदेवाचे मेष राशीमध्ये वक्री आणि अस्त होणे काही राशींसाठी फायदेशीर ठरु शकते.
Web Title: Horoscope rashifal budh vakri mesh rashi these zodiac sign get more profit pdb