-
तरुणांमध्ये सध्या सनग्लासेसची एक वेगळी क्रेझ पाहायला मिळत आहे. हा सर्वात मस्त एॅक्सेसरी मानला जातो, पण काही लोक त्याची गरज नसतानाही वापरतात. पण सनग्लासेस सतत डोळ्यांवर लावून राहिल्यास शरीराच्या सर्केडियन रिदममध्ये अडथळा येऊ शकतो आणि विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. (photo creadit- freepik)
-
सनग्लासेसचा वापर हा सर्वाधिक उन्हाळ्यात केला जातो. यामुळे डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते. पण तुम्हाला माहित आहे का, सनग्लासेसच्या वापरामुळे तुमचे हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात ज्यामुळे निद्रानाश आणि नैराश्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे सनग्लासेस वापरण्याबद्दल तज्ञांचे काय म्हणणे आहे जाणून घेऊ…(photo creadit- freepik)
-
तज्ज्ञांच्या मते, सनग्लासेस सतत वापरल्याने पाइनल ग्रंथीवर वाईट परिणाम होऊ शकतो. सनग्लासेसच्या वापरामुळे मेंदूला असा मेसेज पोहचतो की, बाहेर ढगाळ वातावरण आहे. ज्यामुळे मेंदू त्वचेला स्किन एक्सपोजरसाठी तयार होण्यापासून रोखतो.(photo creadit- freepik)
-
दिवसा सूर्याचे विशिष्ट किरणं डोळ्यांपर्यंत पोहोचतात. यामुळे पिट्यूटरी आणि पाइनल ग्रंथींवर परिमाम होतो,यामुळे मेंदूला वाटते की, बाहेर सूर्यप्रकाश आहे. त्यानंतर त्वचा डायरेक्ट एक्सपोजरसाठी होते आणि व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी तयार होते.(photo creadit- freepik)
-
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सनग्लासेस एखाद्या व्यक्तीच्या सर्केडियन रिदममध्येही अडथळा निर्माण करू शकतात, ज्यामुळे थकवा, निद्रानाश आणि अगदी नैराश्य (सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर) देखील होऊ शकते.(photo creadit- freepik)
-
अशा परिस्थितीत सूर्यप्रकास तुमच्या पाइनल ग्रंथीशी जोडलेल्या मेंदूतील हायपोथालेमसला उत्तेजित करून तुमच्या हार्मोन्सचे नियमन करण्यास मदत करते.(photo creadit- freepik)
-
तज्ञ्जांच्या मते, जेव्हा तुमचे डोळे नैसर्गिकरित्या सूर्यप्रकाश शोषत नाहीत, तेव्हा तुमचे हार्मोन्स सायकल गंभीरपणे बदलले जाऊ शकते, ज्यामुळे तुमच्या बॉडी सिस्टम आणि तुमच्या मूडमध्ये बदल होऊ शकतो.(photo creadit- freepik)
-
त्यामुळे तुमचे डोळे थकू शकतात, कारण त्यांना नैसर्गिक प्रकाश मिळविण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतात. यामुळे कालांतराने दृष्टी खराब होऊ शकते.(photo creadit- freepik)
-
आरोग्य तज्ञ असा निष्कर्ष काढतात की, उन्हात स्कीइंग करताना, पाण्यावर पोहताना किंवा ड्रायव्हिंग करताना उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासेसची गरज असते, परंतु दिवसभर आणि दररोज सनग्लासेस वापरणे गरजेचे नाही.(photo creadit- freepik)
उन्हाळ्यात सनग्लासेस वापरण्यापूर्वी घ्या ‘ही’ काळजी, नाहीतर…
सनग्लासेस डोळ्यांसाठी जसे फायदेशीर असतात तसे ते नुकसानकारकही असतात. सतत सनग्लासेस वापरल्याने तुम्हाला विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो.
Web Title: Summer health problem sunglasses can be bad for health and sleep hormones stress insomia depression sjr