• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 5 minutes jugaad how to clean water pots matichi bhandi cleaning which color clay pots make water cold like fridge kitchen tips svs

५ मिनिटांत पाण्याचा माठ ‘या’ पद्धतींनी होईल पूर्ण स्वच्छ? कोणत्या रंगाचं मडकं पाणी पटकन थंड करतं? पाहा हे उपाय

How To Select & Clean Water Pots: उन्हाळ्यात आपण कोणत्या रंगाचा माठ निवडावा? पाणी थंड करण्यासाठी काय उपाय करावे व सर्वात महत्त्वाचं माठाची स्वच्छता कशी करावी, तुमच्या सर्व प्रश्नांची सोपी उत्तरे जाणून घेऊया ..

April 1, 2024 20:00 IST
Follow Us
  • 5 Minutes Jugaad How To Clean Water Pots Matichi Bhandi Cleaning
    1/9

    उन्हाळ्याच्या दिवसात मन, पोट आणि डोक्याला थंड करणारा मातीचा माठ हा फ्रीजच्या तुलनेत सर्वात स्वस्त व आरोग्यदायी पर्याय ठरतो. यंदा उन्हाळ्यात आपण कोणत्या रंगाचा माठ निवडावा? पाणी थंड करण्यासाठी काय उपाय करावे व सर्वात महत्त्वाचं माठाची स्वच्छता कशी करावी हे जाणून घेणार आहोत.

  • 2/9

    लाल माठ हा शक्यतो विटांच्या लाल मातीने घडवला जातो, पांढरा माठ तर सिमेंट किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवला जातो तर काळा माठ हा थोड्या भुरकट काळ्या मातीने साकारला जातो

  • 3/9

    लाल व काळया माठात माती असल्याने पाणी नैसर्गिक रित्या उत्तम थंड राहू शकतं. काळा हा उष्णता शोषून घेणारा रंग असल्याने काळ्या माठातील पाण्याचा गारवा अन्य दोन माठांच्या तुलनेत थोडा जास्त असू शकतो.

  • 4/9

    पूर्वीच्या काळी पाण्याच्या माठात तांब्या किंवा पितळेचा वाळा टाकण्याची पद्धत होती, यामुळे पाणी स्वच्छही व्हायचं व थंडही राहायचं.वाळा नसल्यास नाणी सुद्धा चालतील

  • 5/9

    जेव्हा तुम्ही पाण्याचा माठ भरता तेव्हा त्याच्या बाहेरील बाजूस आपण एक सुती कापड गुंडाळून ठेवायचं आहे, या कापडावर सुद्धा थोडे गार पाणी घालावे म्हणजे माठातील पाणी थंड होण्याचा वेळ कमी होतो

  • 6/9

    माठ साध्या वाहत्या पाण्याने धुतला तरी हरकत नाही. किंवा गरम पाणी काही वेळ माठात घालून ठेवा

  • 7/9

    लिंबाची साल गरम पाण्यात घालून या सालीने माठाचा आतील भाग स्वच्छ करू शकता. नारळाच्या किशीने माठ आतून बाहेरून घासून धुवू शकता.शक्यतो भांड्यांचा साबण किंवा काथ्या मातीच्या भांड्यावर वापरणे टाळावे

  • 8/9

    बेकिंग सोडा व पाण्याच्या मिश्रणाने माठ आतून स्वच्छ करू शकता. माठ धुवून झाल्यावर कडक उन्हात सुकवत ठेवा. जेणेकरून उन्हामुळे जंतू नष्ट होण्यास मदत होऊ शकते.

  • 9/9

    तुम्ही लाल, काळा कोणताही माठ घ्या पण ते रोज धुवून स्वच्छ करा, नीट झाकून ठेवा, घाणेरडे हात पाण्यात टाकू नका.(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: 5 minutes jugaad how to clean water pots matichi bhandi cleaning which color clay pots make water cold like fridge kitchen tips svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.