-
आजकाल ऑनलाइन डेटिंग अॅप आणि मॅट्रिमोनिअल साइट्सद्वारे जीवनसाथी शोधणे सामान्य झाले आहे. याचे फायदे आहेत त्यापेक्षा ते वापरण्याचे तोटेही अनेक आहेत.
-
कारण काहीजण लोकांची फसवणूक करण्यासाठी या साइट्सचा वापर करतात. यामुळे ऑनलाइन जीवनसाथी शोधताना थोडी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
-
ऑनलाइन पसंत केलेल्या व्यक्तीबाबत कोणताही निर्णय घेताना घाई करु नका. कोणत्याही प्रोफाइलवरुन आलेली रिक्वेस्ट लगेच स्वीकारु नका. सर्व प्रथम त्या व्यक्तीला चांगले जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
-
तुमचा मोबाईल नंबर, बँक अकाउंटची माहिती किंवा घराचा पत्ता यासारखी वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका.
-
ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलत आहात त्या व्यक्तीची वेगवेगळ्या सोशल साईट्सवरील अकाउंट सर्च करा. ज्याद्वारे तुम्हाला ती व्यक्ती तुमच्या ओळखीच्या व्यक्तींपैकी कोणाला ओळखते का हे समजले.
-
याशिवाय त्यांच्या अकाउंटवरील माहिती, फोटो, व्हिडीओवरुन त्याची जीवनशैली समजू शकेल.
-
केवळ चॅटिंगवर अवलंबून राहू नका. व्हिडिओ कॉल करून त्या व्यक्तीशी बोला. यामुळे तुमची त्याच्याशी चांगली ओळख होईल आणि हेतू समजू शकेल, पण लगेचच व्हिडीओ कॉलवर बोलण्याची घाई करु नका.
-
ऑनलाइन चॅटिंग करताना तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणाच्याही गोड बोलण्याने प्रभावित होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीचा हेतू ओळखा मगच त्याच्याशी बोला.
-
तुम्ही ऑनलाइन ओळख झालेल्या व्यक्तीला भेटण्यापूर्वी त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घ्या. त्याने तुम्हाला सर्व गोष्टी खऱ्या सांगितल्या आहेत की नाहीत याची खात्री करा. पहिल्यांदा भेटताना सार्वजनिक ठिकाणी भेटा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीलाबरोबर घेऊन जा.
ऑनलाइन जीवनसाथी शोधताना चुकूनही ‘या’ गोष्टी करु नका, अन्यथा फसवणूक झालीच म्हणून समजा
आजकाल ऑनलाइन डेटिंग अॅप आणि मॅट्रिमोनिअल साइट्सद्वारे जीवनसाथी शोधणे सामान्य झाले आहे पण त्याचा वापर करताना जरा सावधगिरी बाळगणे फार गरजेचे आहे.
Web Title: Do not make these silly mistakes while searching of life partner online sjr