-
स्वयंपाक घरात वस्तू ठेवण्यासाठी वापरले जाणारे, कामावर जाताना अन्नपदार्थ घेऊन जाण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिकचे डबे, बाटल्या यांच्यावर असणारे स्टिकर, कधी आपण एकदाचे काढून मोकळे होतो; असे अनेकांना वाटत असते. मात्र अनेकदा स्टिकर अर्धवटपणे निघून आपल्या हातात येतो. त्याचा अर्धा भाग डब्यावर तसाच चिकटून राहतो. [Photo credit – Freepik]
-
अशावेळेस आपली चिडचिड होते आणि विनाकारण तो स्टिकर काढायच्या नादी लागलो असे वाटू लागते. तुमच्यासोबतही कधी असे झाले असेल आणि तुम्हाला अगदी सहजतेने त्या डब्या-बाटल्यांवरचे स्टिकर काढून टाकायचे असतील, तर या सोप्या पाच टिप्स पाहा. [Photo credit – Freepik]
-
१. साबणाचे पाणी
गरम पाण्यामध्ये काही थेंब लिक्विड साबणाचे टाकून त्यामध्ये डबे बाटल्या काही वेळासाठी बुडवून ठेवा. दोन्ही पद्धतीत, पाण्याचे गरम तापमान आणि साबण यांमुळे तुम्हाला अगदी काही सेकंदात आणि कुठल्याही प्रकारचा चिकटपणा मागे न राहता स्टिकर काढण्यास मदत होऊ शकते. [Photo credit – Freepik] -
२. बेकिंग सोडा आणि तेल
तुमच्या डब्यांवरील चिकट लेबल्स आणि स्टिकर्स काढून टाकण्यासाठी तेल आणि बेकिंग सोडा सम प्रमाणात मिसळून घ्या. हे मिश्रण डब्यांवरील लेबल्सना लावून काही वेळ तसेच ठेवा, नंतर डबे घासून पाण्याने धुवून घ्या. [Photo credit – Freepik] -
३. हेअर ड्रायरचा वापर
केसांसाठी वापरला जाणारा हेअर ड्रायर, तुमच्या डब्यावरील चिकट स्टिकर्स काढण्यासाठी खूप मदत करू शकतो. तुमच्या हेअर ड्रायरचे उच्चतम तापमान सेट करा आणि डब्यावरील लेबलवर वापरा. त्या ड्रायरच्या गरम हवेमुळे, लेबल/स्टिकरचा गम निघून जाऊन स्टिकर आपोआप सुटून येईल. [Photo credit – Freepik] -
४. व्हाईट व्हिनेगर
बेकिंग सोड्याप्रमाणेच व्हिनेगरदेखील या प्रकरणात तुमची मदत करू शकतो. व्हिनेगर घालून त्यामध्ये लेबल/स्टिकर असणारे झाकणं आणि डबे टाकून ३० मिनिटे तसेच ठेऊन द्या. यानंतर गार पाण्याखाली सर्व डबे आणि झाकणं धुवून घ्या. [Photo credit – Freepik] -
५. नेल-पॉलिश रिमूव्हर
नखांवरील रंग काढून टाकण्यासाठीचे नेलपेंट रिमूव्हर डब्यांवरील स्टिकर/लेबल्स काढून टाकण्यास उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला जमेल तितके स्टिकर हाताने काढून टाका. उरलेल्या स्टिकर आणि गमसाठी नेलपेंट रिमूव्हरचा वापर करा. मात्र ही ट्रिक केवळ काचेच्या वस्तूंवर वापरावी. अशी माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखावरून समजते. [Photo credit – Freepik]
‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक