-
फॅटी लिव्हर हा एक गंभीर रोग असून तो जो सिरोसिस आणि कर्करोगासारख्या जीवघेण्या धोक्यांशीही संबंधित आहे. या आजाराच्यावेळी शरीराच्या काही भागांमध्ये सूज आल्यासारखे देखील दिसून येते.
-
यकृतामध्ये चरबी जमा होणे हे अनेक गंभीर आजारांचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
-
फॅटी लिव्हर रोगाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार जास्त मद्यपानामुळे होतो. यालाच अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असेही म्हणतात. आणि दुसरा प्रकार खराब जीवनशैली, लठ्ठपणा आणि मधुमेहामुळे होतो.
-
यकृत हा शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. रक्त फिल्टर करणे, चरबीची बचत करणे आणि शरीरातील घाण काढून टाकणे या प्रक्रियेत यकृत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
-
म्हणूनच यकृताचे आजार झाल्यास शरीर योग्यरित्या कार्य करू शकत नाही आणि गंभीर आजारांना बळी पडते.
-
वाढत्या टप्प्यात, फॅटी लिव्हरमुळे कर्करोग, सिरोसिस यांसारखे आजारही होऊ शकतात. काही लक्षणांच्या आधारे आपण हे आजार वेळीच ओळखू शकतो.
-
फॅटी लिव्हर रोगाशी संबंधित यकृताला होणाऱ्या नुकसानामुळे पायांच्या सभोवतालच्या ऊतींमध्ये द्रव जमा होतो, परिणामी या भागाला सूज येते.
-
यकृताच्या आजाराच्या वाढत्या टप्प्यात पोटात पाणी साचू लागते. यामुळे पोट फुगण्याची समस्या उद्भवते. सिरोसिस आणि कर्करोग म्हणून देखील हे ओळखले जाते.
-
जर यकृताचा आजार अतिशय गंभीर असेल तर पाय आणि घोट्याच्या सूज व्यतिरिक्त पायांच्या तळव्यालाही सूज येऊ लागते. याशिवाय गंभीर आजारात चेहरा आणि हातावर सूज येऊ शकते.
-
फॅटी लिव्हरचे गंभीर परिणाम टाळायचे असतील तर वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करावा. तसेच कमी चरबीयुक्त आहार घ्यावा.
-
पांढरा तांदूळ, बटाटे, पांढरा ब्रेड यांसारख्या कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे आणि फ्रक्टोजने भरपूर रस आणि कार्बोनेटेड पेये पिणे टाळावे. याशिवाय मद्यपान आणि धूम्रपान करू नये.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos: Freepik)
फॅटी लिव्हरने गंभीर स्वरूप गाठल्यास ‘या’ अवयवांना येऊ शकते सूज; खास उपायांनी मिळेल त्वरित आराम
फॅटी लिव्हर हा एक गंभीर रोग असून तो जो सिरोसिस आणि कर्करोगासारख्या जीवघेण्या धोक्यांशीही संबंधित आहे. या आजाराच्यावेळी शरीराच्या काही भागांमध्ये सूज आल्यासारखे देखील दिसून येते.
Web Title: If fatty liver becomes severe these organs may become inflamed special measures will provide immediate relief pvp