-
फळांचा राजा आंबा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण त्याची पाने देखील आपल्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत.
-
उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसे सर्वांनाच आंब्याचे वेध लागतात. आंबा हे अनेकांचे आवडते फळ आहे.
-
केवळ आंबाच नाही तर लोकांना कैरीची चटणी, करी पन्हे, लोणचे खाणेही आवडते. अतिशय चविष्ट असा आंबा आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
-
इतकंच नाही तर आंब्याच्या पानांचेही अनेक आरोग्य फायदे आहेत. आयुर्वेद आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्येही आंब्याच्या पानांना विशेष महत्त्व आहे. आज आपण या पानांचे फायदे जाणून घेऊया.
-
रक्तदाबाच्या रुग्णांसाठी आंब्याच्या पानांचे सेवन फायदेशीर ठरू शकते. ही पाने रक्तवाहिन्या मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. यामुळे बीपी नियंत्रणात राहून ते सामान्य राहण्यास मदत होते.
-
आंब्याच्या पानांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळतात. तसेच ते कर्करोगाचे मुख्य कारण असलेल्या फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान देखील टाळू शकते. अशा स्थितीत आंब्याच्या पानांचे नियमित सेवन केल्यास कर्करोगासारख्या गंभीर आणि घातक आजारापासून दूर राहता येते.
-
मधुमेही रुग्णांना आंबे न खाण्याचा सल्ला दिला जात असला तरी त्याची पाने मधुमेहावर खूप गुणकारी आहेत. त्यांचे सेवन केल्यास मधुमेहाच्या समस्येपासून खूप आराम मिळू शकतो.
-
केसांचे आरोग्य सुधारण्यासाठीही आंब्याची पाने खूप उपयुक्त ठरू शकतात. आंब्याच्या पानांमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून आराम देतात.
-
जर तुम्ही अल्सरच्या समस्येने त्रस्त असाल तर त्याच्या उपचारासाठी तुम्ही आंब्याच्या पानांचा वापर करू शकता.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos: Pexels)
मधुमेह ते कर्करोग, अनेक आजारांवर गुणकारी आहेत आंब्याची पाने; जाणून घ्या जबरदस्त फायदे
आयुर्वेद आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्येही आंब्याच्या पानांना विशेष महत्त्व आहे. आज आपण या पानांचे फायदे जाणून घेऊया.
Web Title: From cancer to diabetes mango leaves are effective against many diseases know the benefits pvp