-
‘फळांचा राजा’ आंबा म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामात सर्वांचे आवडते फळ. उन्हाळ्यापासून पावसाळ्यांपर्यंत आंब्याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात. मार्चपासूनचं लोक आंब्याची वाट पाहत असतात.
-
पण एप्रिलपासून बाजारात आंब्यांची आवक वाढण्यास सुरुवात होते. सुरुवातीचे काही आठवडे किंमत फार जास्त असते. त्यामुळे महागडे आंबे खरेदी करताना ग्राहकांनी काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
-
कारण बाहेरून ताजा चांगला दिसणार आंबा आतून चविष्ट असेलच असे नाही. अशावेळी आंबा आंबट आहे की गोड? केमिकलमध्ये पिकवला की नैसर्गिकरित्या हे कसे ओळखायचे जाणून घेऊ..
-
वेगवेगळ्या राज्यातून येणारे आंबे वेगवेगळ्या आकार, प्रकार, रंग आणि चवीचे असतात. हिरवा आंबा म्हणजे पिकलेला नाही आणि पिवळा आंबा म्हणजे पिकलेला, असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे.
-
कारण आंब्याची चव आणि रंग त्याच्या विविधतेवर अवलंबून असतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही आंबा खरेदी करता तेव्हा त्याच्या रंगापेक्षा त्याच्या सालीकडे जास्त लक्ष द्या.
-
आंबा नैसर्गिकरित्या पिकलेला असेल तर त्याच्या सालीवर एकही डाग नसतो. पण आंबा रसायनांमध्ये पिकवला असेल तर सालीवर काळे डाग दिसतात. रंगावरुनही आंबा ओळखता येतो.
-
तुम्ही पिकलेला आणि गोड आंबा त्याच्या देठावरून देखील ओळखू शकता. यासाठी आंबा खरेदी करताना त्याच्या देठाचा भाग नीट तपासा.
-
देठाभोवती दाब असल्यास, आणि बाकीचा भाग फुगीर आणि मऊ असल्यास, आंबा पूर्णपणे पिकलेला आणि ताजा आणि गोड असतो.
-
आंबा खरेदीपूर्वी त्याचा वास घ्यावा. पिकलेले आणि गोड आंबे ओळखण्याची ही फार जुनी टेक्निक आहे. जर तुम्हाला आंब्याच्या देठाचा वास येत असेल, तसेच एकदम गोड, मधूर वास येत असेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा खरेदी करत आहात असे समजून घ्या.
-
पण आंब्याला अल्कोहोल किंवा रसायनांचा वास येत असेल तर असा आंबा चुकूनही विकत घेऊ नये. कारण या प्रकारचा आंबा खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता.
-
अनेक वेळा बाहेरून पिकलेला आंबा आतून कच्चा निघतो. त्यामुळे आंबा दाबून तपासूनच खरेदी करावा. मात्र, बहुतेकांना ही युक्ती नीट समजत नाही आणि आंबा दाबूनही ते खराब झालेली फळे घरी आणतात.
-
आंबा विकत घेताना लक्षात ठेवा की, तो जास्त घट्ट नसावा आणि जास्त चपटाही नसावा. कारण खूप टनक असलेला आंबा आतून कच्चा असू शकतो, तर चिरल्यावर तो आतून कुजलेला असू शकतो. त्यामुळे नेहमी मऊ आंबा खरेदी करा.
आंबा खरेदी करताना तो आतून गोड आहे की आंबट कस ओळखाल? जाणून घ्या टिप्स
tips to buy sweet mangoes : आंबा आंबट आहे की गोड? केमिकलमध्ये पिकवला की नैसर्गिकरित्या हे कसे ओळखायचे जाणून घेऊ..
Web Title: How to identify sweet mango without cutting 5 tricks to identify ripe and sweet mango sjr