• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 100 gram onion has magical benefits blood sugar control cancer treatment can pregnant women eat pyaaj how much calories onion contains svs

१०० ग्रॅम कांद्यामध्ये दडलंय काय? कांद्याचा मधुमेह रुग्णांना, गरोदर महिलांना, काय फायदा होतो? पाहा पोषणाची आकडेवारी

Benefits of Eating Onion: कांदा रडवूनही आपल्याला किती फायदे देऊ शकतो हे सांगणारी पोषणाची आकडेवारी आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, फार नाही तर केवळ १०० ग्रॅम कांदा आपल्या आरोग्याला कसा हातभार लावतो हे पाहा.. /

May 7, 2024 20:00 IST
Follow Us
  • 100 Gram Onion has Magical Benefits
    1/12

    जगभरातील कांद्याची मुबलक उपलब्धता पाहिल्यास हा आहाराचा एक मुख्य भाग बनला आहे. मधुमेही, गर्भवती महिला व तुम्हा- आम्हा सगळ्यांनाच कांद्यातून काय फायदे मिळतात याची ही आकडेवारी…

  • 2/12

    केअर हॉस्पिटल्स, भुवनेश्वर येथील वरिष्ठ आहारतज्ज्ञ गुरु प्रसाद दास यांनी १०० ग्रॅम कांदा आपल्या शरीरात नेमके काय बदल घडवून आणू शकतो आणि कोणती पोषक सत्व पुरवतो याविषयी सविस्तर माहिती दिली आहे

  • 3/12

    अँटिऑक्सिडंट्स: कांद्यामध्ये क्वेर्सेटिनसह भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यात दाहक-विरोधी आणि कर्करोगविरोधी गुणधर्म असतात

  • 4/12

    हृदयासाठी उत्तम: कांद्यामधील फ्लेव्होनॉइड्स आणि सल्फर कोलेस्टेरॉलची पातळी सुधारून तसेच रक्तदाब कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

  • 5/12

    रोगप्रतिकारक शक्ती: कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवून संक्रमणाशी लढण्यास मदत करते

  • 6/12

    कर्करोगविरोधी क्षमता: काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की कांद्यामधील गुणधर्म कर्करोगाशी लढण्यास मदत करू शकतार विशेषतः गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि प्रोस्टेट कर्करोगात याचा फायदा होऊ शकतो

  • 7/12

    मधुमेहाचे रुग्ण संतुलित आहाराचा भाग म्हणून कांद्याचे सेवन करू शकतात. कांद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि कांद्यामुळे शरीराला फायबर मिळते तसेच. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते

  • 8/12

    कांद्यातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण पाहता सेवन विचारात घेणे महत्वाचे आहे. तसेच कांद्याच्या सेवनानंतर व आधी मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण केले पाहिजे.

  • 9/12

    कांद्यामध्ये नैसर्गिक शर्करा असते, परंतु त्यांच्यातील फायबर सामग्रीमुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर त्यांचा एकंदर परिणाम कमी होतो, मात्र तुम्हाला ब्लड शुगरचा कितपत त्रास आहे यानुसार सेवनाचे प्रमाण निश्चित करा.

  • 10/12

    कांद्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असल्याने सेवन गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र आजारांचे संभाव्य धोके टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे महत्वाचे आहे.

  • 11/12

    कांद्यात पोटॅशियम असते, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. पण उच्चरक्तदाब असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात कांद्याचा समावेश केल्यास सोडियमच्या इतर स्त्रोतांवर नियंत्रण ठेवायला हवे. जास्त सोडियम उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरू शकतो

  • 12/12

    काही व्यक्तींना कांद्याची ऍलर्जी असू शकते. तुम्हाला ऍलर्जी माहीत असल्यास किंवा वारंवार दिसू लागल्यास सेवन त्वरित थांबवा शिवाय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: 100 gram onion has magical benefits blood sugar control cancer treatment can pregnant women eat pyaaj how much calories onion contains svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.