-
उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्स, दही, ताक सर्रास प्यायले जाते. ही पेय दिवसाच्या कोणत्याही वेळेस प्यायले जातात. मात्र, ताकाबद्दल बोलायचे झाले तर ते योग्य वेळेस न प्यायल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
-
व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले हे दही केवळ पोटाला थंड ठेवत नाही तर शरीरातील वात, पित्त आणि कफ संतुलित करण्यास देखील उपयुक्त आहे. पण जेव्हा तुम्ही चुकीच्या वेळी याचे सेवन करता तेव्हा ते तुमच्या शरीरात या तिन्हींचे असंतुलन निर्माण करू शकते, ज्यामुळे तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
-
म्हणूनच ताक पिण्याची योग्य वेळ जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज आपण जेवल्यानंतर किती वेळाने ताक प्यावे याबाबत जाणून घेऊया. (फोटो – एक्सप्रेस)
-
जेवण घेतल्यानंतर १० मिनिटांनी ताक प्यावे. जेवताना ताक प्यायल्याने पाचक एंझाइम्सवर परिणाम होऊ शकतो आणि पोटातील चयापचय गती बिघडू शकते. यामुळे सूज येऊ शकते. म्हणूनच जेवताना नाही तर जेवल्यानंतर १० मिनिटांनी ताक प्यावे. (फोटो – एक्सप्रेस)
-
ताक पिण्याची उत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणानंतर. यावेळी ताकात थोडे मीठ आणि जिरे घालून प्यावे. (फोटो – एक्सप्रेस)
-
खरं तर, आपले पोट साधारणपणे १ ते ३ च्या pH वर चालते. ताक प्यायल्यानंतर पोटाचा पीएच ३-५ पर्यंत कमी होतो.
-
जेवणानंतर प्यायलेले ताकासारखे अम्लीय असेल तर ते तुमच्या पोटातील आतड्यांतील बॅक्टेरियाला प्रोत्साहन देते, पचन सुधारते आणि नंतर पीएच संतुलित करते आणि आम्लता आणि इतर समस्या टाळते. (फोटो – फ्रीपिक)
-
दुपारच्या जेवणानंतर ताक पिण्याचे फायदे पाहा.
-
दुपारी ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. दिवसाच्या या वेळी ताकाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते, पचन सुधारते आणि शरीरातील चयापचय क्रिया वाढते. (फोटो – फ्रीपिक)
-
तसेच, ताक प्यायल्याने पोट भरलेले राहते आणि अतिरिक्त खाणे टाळता येते. यामुळेच वजन संतुलित राहू शकते. (फोटो – फ्रीपिक)
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (फोटो – फ्रीपिक)
Summer Health Tips: जेवणानंतर किती वेळाने ताक प्यावे? जाणून घ्या ताक पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत
ताक पिण्याची योग्य वेळ जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज आपण जेवल्यानंतर किती वेळाने ताक प्यावे याबाबत जाणून घेऊया.
Web Title: Whats best time to drink buttermilk benefits drinking buttermilk ieghd import pvp