-
पावसाळ्यात अनेक आजार होण्याची शक्यता असते. हे आजार आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ति कमी करतात. या आजारांमुळे आपल्याला संक्रमण देखील होऊ शकतं.
-
तज्ञांच्या मते पावसाळ्यात काही पदार्थ नैसर्गिकरित्या संक्रमणांपासून तुमचे रक्षण करून रोगप्रतिकार शक्ति वाढवतात.
-
जाणून घेऊया या विशेष पदार्थांबद्दल.
-
हळद हे दाहक-विरोधी,अँटिऑक्सिडंट आणि अनेक औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. पावसाळ्यात तुम्ही दुधामध्ये हळद टाकून पिऊ शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि हे संक्रमणांशी लढण्यास मदत देखील करते.
-
पावसाळ्यात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सर्दी-खोकला या आजारांशी लढण्यासाठी आलं हे एक सोपं नैसर्गिक उपाय आहे. यामधील दाहक-विरोधी गुणधर्म तुम्हाला पावसाळ्यात होणाऱ्या संक्रमणांशी लढण्यास मदत करते.
-
तुम्ही पावसाळ्यात हिरव्या पाल्या भाज्या खाऊ शकता. पाल्या भाज्या हे अँटिऑक्सिडंट्सने आणि जीवनसत्त्वे सी, ई, आणि ए ने समृद्ध असतात. तुम्ही रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आपल्या आहारात पाल्या भाज्यांचे समावेश करू शकता.
-
अँटिऑक्सिडंट्स व्हिटॅमिन सी समृद्ध ब्लूबेरी फळ हे पावसाळ्यात शरीराचे आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. यामधील व्हिटॅमिन सी शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींचे प्रमाण वाढवतात. हे संक्रमणाशी लढून तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
-
बदाम व्हिटॅमिन ई चा एक उत्तम स्रोत आहे. हे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी वाढवण्यास मदत करते. बदामांमध्ये कॅलरीज जास्त असल्यामुळे दिवसाला तुम्ही पाच ते सहा बदाम खाऊ शकता.
-
ग्रीन टी कॅटेचिन नावाच्या अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि विविध संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकते. प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच, ग्रीन टी चयापचय वाढवण्यास आणि अनेक आरोग्य फायदे देखील देते. (सर्व फोटो : Unsplash)
नैसर्गिकरित्या रोग प्रतिकारशक्ति कशी वाढवायची? ‘या’ पदार्थांचे करा सेवन; वाचा तज्ज्ञांचे मत
तज्ञांच्या मते पावसाळ्यात काही पदार्थ नैसर्गिकरित्या संक्रमणांपासून तुमचे रक्षण करून रोगप्रतिकार शक्ति वाढवतात. जाणून घेऊया या विशेष पदार्थांबद्दल.
Web Title: How to boost immunity naturally consume these foods read expert opinion arg 02