-
शनिदेव हा आपल्याला कर्माचं फळ देतो. ज्या लोकांनी चांगले कर्म केले त्यांच्यावर शनी प्रसन्न असतो पण ज्यांचे कर्म वाईट असतं त्यांच्यावर शनिची वक्रदृष्टी असते, असे बोललं जातं.
-
शनी खूप हळू चालतो. यामुळेच शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे घालवतो. यावेळी शनी मूळ त्रिकोणी कुंभ राशीत आहे.
-
शनि जयंती म्हणजे शनिदेवाचा जन्मदिवस. न्यायाधिकारी शनिदेवाची यंदाची जयंती ६ जून २०२४ ला जुळून आली आहे.
-
शनि जयंतीपासून शनिदेवाच्या कृपेने काही राशींना चांगले दिवस अनुभवता येऊ शकते. त्यांच्यासाठी धन आणि प्रगतीचे योग बनू शकते. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
शनी जयंती ही मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. कुटुंबात सुख-शांति नांदण्याची शक्यता आहे.
-
मिथुन राशीच्या मंडळींवर सुद्धा शनिदेवाची अमाप कृपा राहू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. अचानक धनलाभ होऊन तुमचं बँक बॅलेन्समध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते.
-
शनिदेवाच्या कृपेने कुंभ राशींच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. प्रत्येक कामात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम )
आज शनि जयंतीपासून ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? श्रीमंती? शनिदेवाच्या कृपेने लक्ष्मी येऊ शकते दारी
Shani Jayanti 2024: शनि जयंतीपासून ‘या’ राशींना प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता आहे, पाहा तुमची रास आहे का यात…
Web Title: Shani jayanti 2024 positive impact on these zodiac sing can get huge money pdb