-
ज्योतिषशास्त्रात नवग्रह महत्त्वाचे मानले जातात. हे सर्व ग्रह विशिष्ट कालावधीनं आपापलं राशी स्थान बदलत असतात. या स्थान बदलाला प्रचंड महत्त्व असतं. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात.
-
ग्रहांच्या राशीबदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्वच राशींवर होत असतो. या जून महिन्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन करत आहे. आता येत्या दिवसात सूर्य, बुध आणि शुक्र राशी बदल करणार आहेत.
-
सूर्य, बुध आणि शुक्र वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. येत्या १२ जूनला शुक्रदेव मिथुन राशीत प्रवेश करत आहेत तर १४ जूनला बुधदेव मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत आणि १५ जूनला सुर्यदेव मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत.
-
या तिन्ही ग्रहांच्या राशी बदलामुळे काही राशींना जीवनात अपार सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. पाहा भाग्यशाली राशी…
-
सूर्य, बुध आणि शुक्रदेवाचे राशी बदल मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरु शकते. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो. या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी लाभू शकतात.
-
सूर्य, बुध आणि शुक्रदेवाच्या राशी बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही पैसा कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायात सतत नफा मिळू शकतो.
-
सिंह राशीच्या लोकांना सूर्य, बुध आणि शुक्रदेवाच्या राशी बदलामुळे दीर्घकाळ चाललेल्या आर्थिक संकटातून सुटका मिळू शकते. या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमधील तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )
चार दिवसांनी ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? तीन ग्रहांचे राशीपरिवर्तन होताच लक्ष्मी येऊ शकते दारी
Grah Gochar 2024 June: ज्योतिषशास्त्रानुसार, तीन मोठ्या ग्रहांची चाल बदलणार आहे. त्यामुळे काही राशींना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे.
Web Title: Surya shukra budh planet transit in gemini positive impact on these zodiac sing can get huge money pdb