-
बदलते हवामान, धूळ आणि प्रदूषणामुळे आपल्या केसांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. विशेषत: पावसाळ्यात अनेकांना कोंडयाचा त्रास जाणवतो.
-
सर्वप्रथम एका भांड्यात कांदा बारीक करुन त्याचा रस काढा. यानंतर केस स्वच्छ धुवून मग त्याचे पार्टेशन करा, आता कांद्याच्या रसात कापसाचा एक बोळा बुडवा आणि संपूर्ण टाळूवर लावा, काही मिनिटे तो सुकून कोरडा होऊ द्या.
-
यानंतर माइल्ड शॉम्पू आणि कंडिशनरने केस धुवा. धुतल्यानंतर हेअर ऑइलचे काही थेंब घेऊन केसांना लावा. यामुळे तुमच्या केसांमधला कांद्याच्या रसाचा वास नाहीसा होईल.
-
कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते, जे केसांचे पोषण करण्यास मदत करते. तसेच, केस गळणे थांबवते आणि केस मजबूत होतात. याशिवाय, हे आपले निर्जीव आणि कोरडे केस मऊ आणि रेशमी बनवते.
-
केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी शुद्ध कांद्याचा रस अतिशय उपयुक्त मानला जातो. हे केसांच्या कूपांना उत्तेजित करण्यास मदत करते.
-
तसेच, केसांच्या मुळांमध्ये रक्त परिसंचरण सुधारून, ते केस निरोगी बनवते आणि वाढीस प्रोत्साहन देते.
-
कांद्याच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळे केस खराब होण्यापासून बचाव करतात.
-
कांद्याचा रस नियमितपणे केसांना लावल्यास केसांतून कोंड्याची समस्याही निघून जाईल आणि केस मजबूत होतील.
कोंड्याच्या समस्येने तुम्ही हैराण आहात? मग केसांवर कांद्याचा ‘हा’ उपाय करुन पाहाच
natural hair mask : तुम्ही कांद्याचा रस कोंडा दूर करण्यासाठी आणि केस सुंदर ठेवण्यासाठी वापरु शकता. पण तो कशाप्रकारे वापरायचा जाणून घेऊ….
Web Title: Diy monsoon haircare onion juice to get rid of dandraff in marathi sjr