-
जुन जुलै महिन्यात घरात डास खूप येतात. उन्हाळ्याचा शेवट असतो अन् पावसाळा सुरू होतो. डासांपासून वाचण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो. (Photo : pexels)
-
खरं तर डासांपासून रोगराई पसरते. अशात आरोग्य जपायचे असेल तर डासांपासून दूर राहणे गरजेचे आहे. (Photo : pexels)
-
डासांपासून वाचवण्यासाठी आपण अनेकदा घरगुती उपाय करतो पण काहीवेळा त्याचा काहीही फायदा होत नाही. सोशल मीडियावर डासांना पळवण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. (Photo : pexels)
-
फक्त एका कांद्याचा वापर करून तुम्ही डास पळवू शकता. तुम्हाला वाटेल ते कसं शक्य आहे? पण हे खरंय. एका कांद्याच्या मदतीने डास पळवता येतात. (Photo : pexels)
-
सुरुवातीला एक कांदा घ्या. त्यानंतर कांद्याची खालची बाजून थोडी कापून घ्या त्यानंतर एका छोट्या चमच्याने कांद्याच्या आतील भाग थोडा काढून घ्या (Photo : pexels)
-
त्यानंतर तीन कापूरच्या गोळ्या घ्या. त्यात दोन तीन लवंग घ्या. कापूरच्या गोळ्या आणि लवंग बारीक वाटून घ्या. (Photo : pexels)
-
त्यानंतर एका प्लेटमध्ये कांदा ठेवा. कांद्याचा आतील भाग काढल्यामुळे कांद्याला वाटीसारखा आकार येईल. (Photo : pexels)
-
त्यात थोडं तेल टाका आणि कापूर आणि लवंगचे बारीक केलेले मिश्रण त्यात टाका. त्यानंतर वात घ्या आणि दिवा लावा. (Photo : pexels)
-
संध्याकाळी हा दिवा लावल्याने घरातील डास गायब होतील. डासांपासून सुटका मिळवायची असेल तर घरगुती उपाय फायद्याचा ठरू शकतो. (Photo : pexels)
फक्त एका कांद्याच्या मदतीने पळवा घरातील डास, जाणून घ्या, कसे?
डासांपासून वाचवण्यासाठी आपण अनेकदा घरगुती उपाय करतो पण काहीवेळा त्याचा काहीही फायदा होत नाही. सोशल मीडियावर डासांना पळवण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात.
Web Title: How to get rid of mosquitoes at home with the help of single onion video goes viral ndj