-
Black Salt Water Benefits हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, पांढऱ्या मिठाऐवजी काळ्या मिठाचे आरोग्याला अनेक फायदे होतात. (Photo: Freepik)
-
काळ्या मिठाचा वापर लोणचं बनवण्यासाठी, सलादमध्ये, काही ड्रिंक्समध्ये, लिंबू पाण्यात आणि फ्रूट सलादमध्ये केला जातो. ज्यामुळे टेस्ट वाढते. काळ्या मिठामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमसारखे पोषक तत्व असतात. (Photo: Freepik)
-
जर तुम्ही रोज काळ्या मिठाचं पाणी प्याल तर शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. याचा आहारात समावेश केल्याने पोट आणि शरीर दोन्ही थंड राहतात. एवढेच नाही तर अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. (Photo: Freepik)
-
कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून प्यायल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. याशिवाय यकृताचेही डिटॉक्सिफिकेशन होते. त्याचवेळी, ते यकृताच्या कार्यास गती देते. तसेच अनेक आजारांपासून बचाव होतो. (Photo: Freepik)
-
कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून प्यायल्याने शरीरातील सर्व घाण निघून जातात. हे शरीरात किंवा शिरांमध्ये अडकलेली सर्व घाण बाहेर काढते.(Photo: Freepik)
-
जर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव झाले असतील, तर ते मजबूत करण्यासाठी काळे मीठ वापरू शकता. दुतोंडी केसांची समस्या असल्यास हेअर पॅकमध्ये काळे मीठ मिसळा. काळ्या मिठामुळे केसांना आवश्यक ते सर्व पोषक घटक मिळतात. (Photo: Freepik)
-
काळ्या मीठामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यात मदत करतात. यासाठी कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून त्वचेवर लावा. (Photo: Freepik)
-
काळे मीठ पाण्यात मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठतेसारख्या गंभीर समस्यांपासून कायमचा आराम मिळतो. पोट निरोगी ठेवण्यासोबतच ते चयापचय देखील मजबूत करते.(Photo: Freepik)
-
भारतात वजन वाढण्याची समस्या फारच वाढली आहे. एकदा का वजन वाढलं तर अनेक आजार होतात. काळ्या मिठाच्या पाण्यात अॅंटी-ओबेसिटी तत्व अशतात ज्यामुळे वाढणारं वजन कमी होण्यास मदत मिळते.(Photo: Freepik)
केस गळतीनं वैतागला आहात का? काळ्या मिठाचं पाणी प्या अन् फरक बघा; जाणून घ्या योग्य पद्धत
तुम्ही रोज काळ्या मिठाचं पाणी प्याल तर शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. याचा आहारात समावेश केल्याने पोट आणि शरीर दोन्ही थंड राहतात. एवढेच नाही तर अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. चला जाणून घेऊ याचे फायदे…
Web Title: Black salt water benefits black salt water for hairs and skin lifestyle health tips srk