-
अयोग्य जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आज, जगभरातील लोक मोठ्या संख्येने या आजाराने ग्रस्त आहेत.
-
इतकंच नाही तर कमी वायतील लोकांनासुद्धा या आजाराने विळखा घातला आहे. म्हणूनच सर्वच वयोगटातील लोकांनी मधुमेहापासून स्वतःचा बचाव करणे गरजेचे आहे.
-
मधुमेह हा क्रोनिक आजार असल्याने यामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. बदलत्या जीवनशैलीमुळे आज मोठ्या प्रमाणात लोक मधुमेहाला बळी पडत आहेत. तरुणांमध्येही हा आजार हळूहळू वाढत आहे.
-
ब्रिटनच्या डायबेटिक असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांमध्ये ४० वर्षाखालील लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण २३ टक्क्यांनी वाढले आहे.
-
ब्रिटनच नाही तर भारतातही ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. इथेही ३० ते ४० वयोगटातील लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
-
आज आपण जाणून घेऊया, कोणत्या वयात मधुमेहाचा धोका सर्वात जास्त असतो आणि तो टाळण्यासाठी काय करायला हवे.
-
एका अहवालानुसार, ४५ वर्षांनंतर टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
-
अमेरिकेतील १४% लोकांमध्ये या प्रकारचा मधुमेह आढळून आला आहे. या सर्वांचे वय ४५ ते ६४ वर्षे आहे.
-
ही संख्या १८ ते ४४ वयोगटातील लोकांपेक्षा जवळपास पाच पट जास्त आहे. जसजसे वय वाढते तसतसे मधुमेहाचा धोकाही वाढतो.
-
टाइप 2 मधुमेह ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये देखील आढळतो. अशा परिस्थितीत काय करावे जाणून घ्या.
-
आपली जीवनशैली सुधारावी. जास्त गोड किंवा जास्त खारट खाऊ नयेत. तेलकट पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे, हिरव्या भाज्या खाव्यात आणि जंक फूड, दारू आणि सिगारेट टाळावे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos: Freepik)
Diabetes Tips: ‘या’ वयोगटातील लोकांना मधुमेह होण्याचा धोका सर्वाधिक! जाणून घ्या, सोप्या बचाव पद्धती
मधुमेह हा क्रोनिक आजार असल्याने यामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. बदलत्या जीवनशैलीमुळे आज मोठ्या प्रमाणात लोक मधुमेहाला बळी पडत आहेत.
Web Title: Health tips people of this age are most at risk of getting diabetes know the simple prevention methods pvp