-
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष महत्व आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा शारीरिक सुख, वैवाहिक सुख, विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य आणि प्रणय यांचा कारक मानला जातो.
-
शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे माणसाच्या आयुष्यात सुखात वाढ होते, असे म्हटले जाते.
-
१२ जूनला शुक्राने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. आता शुक्रदेवाचा ३० जून रोजी मिथुन राशीत उदय होणार आहे. यामुळे काही राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे.
-
शुक्राच्या उदयामुळे अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांना लाभ होऊ शकतो.
-
शुक्रदेवाच्या कृपेने वृषभ राशींच्या लोकांना मोठे फायदे मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
-
कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे उदय स्थितीत असणे लाभदायी ठरु शकते. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो.
-
शुक्रदेवाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. व्यवसायाशी निगडित लोक प्रचंड यश प्राप्त करु शकतात. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
११ दिवसांनी ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? शुक्रदेव उदय होताच लक्ष्मी कृपेने मिळू शकतो अपार पैसा
Shukra Uday 2024: शुक्राचा लवकरच मिथुन राशीत उदय होणार आहे. त्यामुळे काही राशींचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात.
Web Title: Shukra uday venus rise 2024 in mithun these zodiac sing can get huge money pdb