-
कोरोना महामारीमध्ये संपूर्ण देशात कामाच्या पद्धतीत बदल झाला. एवढंच नाही तर काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुद्धा देण्यात आले. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मात्र लॉकडाउन संपल्यानंतरही काही कंपन्यांनी ही पद्धत कर्मचाऱ्यांसाठी तशीच चालू ठेवली. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, वर्क फ्रॉम होम काही जणांसाठी खूप आव्हानात्मक ठरते आहे. वैयक्तिक आणि ऑफिसचे काम यात समतोल राखता येत नाही. तर वर्क फ्रॉम होम करताना तुम्हालाही अडचणी येत असतील. तर तुम्ही काम करताना पुढील काही सवयी स्वतःला लावा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
काही जण काम करताना जागेवरून उठत नाहीत, वेळेत जेवत नाहीत. तर यामुळे तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तर हे टाळण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करून पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. डेस्क तयार करा – काम करण्यासाठी घरात एक डेस्क तयार करा. तुमचा डेस्क स्वछ आणि नीटनेटका ठेवा. त्यामुळे तुम्हाला कामात लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. कामाचे तास काटेकोरपणे पाळा – तुम्ही घरून काम करताय म्हणून आरामात काम करू नका. हे तुमचे लक्ष विचलित करू शकते. म्हणून कामाचे तास काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. ब्रेक घ्या – नियमित ब्रेक घेऊन शरीराची हालचाल करा. अंगदुखी टाळण्यासाठी तुम्ही घरामध्ये फेऱ्या किंवा स्ट्रेचिंग व्यायाम करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. वेळापत्रक तयार करा – वेळापत्रकाने दिनचर्या तयार होण्यास मदत होते आणि शिस्तीला चालना मिळते. हे एखाद्याला कामाप्रती प्रेरित राहण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. व्यवस्थित कपडे घाला – घरून काम करताना पायजमा, नाईट ड्रेस घालणे टाळा. त्याऐवजी छान तयार होऊन बसा . कामाप्रती प्रेरित राहण्याचा, व्यावसायिक दिसण्याचा, आणि तुमचा मेंदू कामाच्या मोडमध्ये ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
How to Work from Home: ‘वर्क फ्रॉम होम’ करताय? ‘या’ पाच सवयी स्वतःला लावा; वेळेत काम होण्यास होईल मदत
How to Work from Home: वर्क फ्रॉम होम काही जणांसाठी खूप आव्हानात्मक ठरते आहे. वैयक्तिक आणि ऑफिसचे काम यात समतोल राखता येत नाही…
Web Title: The ultimate guide to working from home one of the top tips for working remotely is to take breaks you must follow this tips and tricks asp