-
सध्याच्या अनेक महिला नोकरी व घर आदी दोन्ही गोष्टी सांभाळतात. त्यामुळे नोकरी सांभाळत त्यांना स्वतःच्या मुलांकडेही लक्ष द्यावे लागते, त्यांचा चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात आणि त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्य व्यवस्थित आहे का याकडेही पाहावे लागते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर तुम्ही सुद्धा सकाळी उठल्यावर तुमच्या मुलांना पुढील सवयी लावा आणि त्यांच्या दिवसाची सुरुवात अगदी छान करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. व्यायाम करा : तुमच्या मुलांना दिवसाची सुरुवात काही सोप्या स्ट्रेचिंग व्यायामाने करण्यास सांगा. स्ट्रेचिंगमुळे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. अंथरुण घडी घाला: मुलांना सकाळी उठल्यानंतर स्वतःची चादर घडी करण्यास सांगा. यामुळे त्यांच्यात जबाबदारीची व कर्तृत्वाची भावना निर्माण होईल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. दात घासणे व चेहरा धुणे: सकाळी उठल्यानंतर दात घासणे व चेहरा धुणे मुलांना ताजे, स्वच्छ वाटण्यास मदत करू शकते. ही दिनचर्या दातांच्या आरोग्यही सुधारण्यास मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. पौष्टीक नाश्ता खा: सकाळी पौष्टिक नाश्ता खा. जेणेकरून ते मुलांच्या शरीराला ऊर्जा व पोषक तत्वे प्रदान करते ; जी मुलांना एकाग्र करण्यासाठी आणि दिवसभर सक्रिय राहण्यासाठी आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. पाणी प्या : मुलांना हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी एक ग्लास पाणी त्यांना नक्की द्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
६. दिवसाची योजना करा: तुमच्या मुलांबरोबर दिवसांच्या वेळापत्रकावर चर्चा करण्यासाठी काही मिनिटे घालवा. हे जाणून घेतल्याने त्यांची चिंता कमी होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
७. सकारात्मक विचार करा व बोला : दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी केल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढू शकतो. त्यांना ‘मी हुशार आहे’ किंवा ‘माझ्या मनात जे काही आहे ते मी करू शकतो’ आदी गोष्टी बोलण्यास सांगा. यामुळे सकारात्मक मानसिकता विकसित होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
सकाळी उठल्यावर तुमच्या मुलांना ‘या’ सात गोष्टींची लावा सवय ; दिवसभर राहतील फ्रेश; नक्की वाचा टिप्स
सकाळी उठल्यानंतर दात घासणे व चेहरा धुणे मुलांना ताजे, स्वच्छ वाटण्यास मदत करू शकते…
Web Title: This seven things things kids should do first thing in the morning follow this tips and tricks and make them healthier and happier asp