• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how many types of kanwar yatra and what it means during saawan this one is the most difficult spl

PHOTOS : श्रावण महिन्यातील पवित्र ‘कावड’ यात्रांचे किती प्रकार असतात? ‘ही’ असते सर्वात कठीण यात्रा

How many types of Kanwar Yatra: श्रावण महिन्यात कावड यात्रेला विशेष महत्त्व आहे. पण कावड यात्रेचे किती प्रकार आहेत आणि नियम काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया

July 11, 2024 14:21 IST
Follow Us
  • How many types of Kanwar Yatra
    1/7

    श्रावण महिना आपल्या देशात महादेवाला समर्पित असतो. शिवभक्तांसाठी हा महिना खास असतो. श्रावण महिन्यात शिवभक्त मंदिरात जाऊन शंकराचा जलाभिषेक करतात. श्रावण महिन्यातच कावड यात्राही काढली जाते ज्यात भक्त पवित्र ठिकाणाहून गंगाजल आणतात आणि शिवलिंगाला अभिषेक करतात. (इंडियन एक्सप्रेस)

  • 2/7

    पण कावड यात्रेचे किती प्रकार आहेत आणि त्याचे नियम काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? यातील सर्वात एक अशीही सर्वात कठीण कावड यात्रा आहे जी प्रत्येकाला करणे जमत नाही. (इंडियन एक्सप्रेस)

  • 3/7

    साधी कावड
    ही सर्वात सामान्य कावड यात्रा आहे. यामध्ये कावडे वाटेल तिथे विश्रांती घेऊ शकतात. या यात्रेत दोन भांडी पवित्र अशा गंगाजलाने भरून बांबूच्या काठीवर टांगली जातात. कावडे ते खांद्यावर घेऊन पायी चालतात. अशा कावडी वाहणाऱ्या भक्तांसाठी सामाजिक संस्थांशी संबंधित लोक पंडाल लावतात, जिथे जेवण आणि विश्रांती घेतल्यानंतर, कावड्यांचा प्रवास पुन्हा सुरू होतो. (इंडियन एक्सप्रेस)

  • 4/7

    डाक कावड
    ही सर्वात कठीण कावड यात्रा मानली जाते. या यात्रेत कावड्याला लवकरात लवकर ही यात्रा पूर्ण करावी लागते. कुठेही न थांबता कावडे वेगाने पुढे जातात आणि निर्धारित वेळेत त्यांच्या देवस्थानी अभिषेकासाठी पोहोचतात. डाक कावडीवेळी कावडे विश्रांती घेऊ शकत नाहीत. तसेच गंगेचे पवित्र पाणी जमिनीवर पडणार नाही याचीही मोठी खबरदारी त्यांना घ्यावी लागते (इंडियन एक्सप्रेस)

  • 5/7

    मान्यतेनुसार, डाक कावड यात्रे दरम्यान कावडे लघवी आणि मलही करू शकत नाहीत. नियम मोडल्यास हा प्रवास विस्कळीत होतो. त्याचबरोबर डाक कावड्यांना तामसिक भोजन करण्यास मनाई असते, यात्रेदरम्यान त्यांना सात्विक राहावे लागते. (इंडियन एक्सप्रेस)

  • 6/7

    उभी कावड
    खादी कावडही खूप अवघड असल्याचं म्हटलं जातं. यामध्ये सरळ बांबूच्या उभ्या काठीला वरच्या टोकाला पाण्याचे भांडी लावलेली असतात. एका ठराविक ठिकाणी ठेवताना ती उभी केले जातात. (इंडियन एक्सप्रेस)

  • 7/7

    झोका कावड यात्रा
    झोका कावड यात्रेत कावड्यांच्या खांद्यावर दोन्ही बाजूंनी बांबूच्या काठीवर भांडी लटकलेली असतात. ही यात्रा विशेषतः लहान मुलांसाठी असते. पौराणिक कथेनुसार, त्रेता युगामध्ये श्रवण कुमार याने कावड यात्रेची सुरुवात केली होती. त्याच्या अंध आई-वडिलांनी हरिद्वार येथील गंगेत स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली. अशा स्थितीत त्यांचा मुलगा श्रावणकुमार याने आई-वडिलांना खांद्यावर घेऊन पायी प्रवास केला आणि त्यांना गंगेत स्नान घातले. यानंतर त्यांनी तेथून गंगाजल सोबत नेले, ज्याने त्यांनी भगवान शिवाला विधीपूर्वक अभिषेक केला. तेव्हापासून कावड यात्रा सुरू झाली, अशी धार्मिक धारणा आहे. (इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: How many types of kanwar yatra and what it means during saawan this one is the most difficult spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.