-
काही लोकांना मायग्रेन सुरू होण्यापूर्वी काही लक्षणे दिसू लागतात, ज्याला प्रोड्रोम म्हणतात. मायग्रेन सुरू होण्याच्या काही तास किंवा दोन दिवस आधी ही लक्षणे दिसू शकतात.
-
मायग्रेनने ग्रस्त असलेल्या ६०% लोकांना ही लक्षणे दिसतात. या लक्षणांमध्ये बद्धकोष्ठता किंवा अतिसार, मनःस्थिती बदलणे, मान आखडणे आणि काही खाद्यपदार्थ किंवा पेये घेण्याची लालसा यांचा समावेश असू शकतो.
-
मायग्रेनच्या आधी किंवा त्या दरम्यान, काही लोकांची दृष्टी आणि इतर संवेदनांमध्ये बदल होऊ शकतात. मायग्रेन असणाऱ्या सुमारे २०% लोकांना हा अनुभव येतो.
-
या लक्षणांमध्ये दृष्टी गमावणे, प्रखर प्रकाश किंवा स्पॉट्स दिसणे, आवाज किंवा संगीत ऐकू येणे, हाता-पायांमध्ये पिन आणि सुया टोचल्यासारखे जाणवणे यांचा समावेश होतो. अशा वेळेस काय करावे, जाणून घ्या.
-
कॅफिनचे सेवन करावे : काही लोकांसाठी, कॉफी, चहा किंवा कोला पिल्याने डोकेदुखी कमी होऊ शकते, परंतु त्याचे जास्त सेवन करू नये आणि झोपण्यापूर्वी कॅफीन घेणे टाळावे.
-
हीटिंग पॅड किंवा आइस पॅक वापरावे : तुमच्या डोक्यावर किंवा मानेवर बर्फ किंवा गरम पाण्याचा शेक दिल्याने वेदना कमी होऊ शकतात.
-
हायड्रेटेड राहावे : पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा आणि वेळोवेळी पाणी प्या.
-
जास्त औषध घेऊ नये : जास्त औषध घेणे देखील हानिकारक असू शकते. महिन्यातून दहा दिवसांपेक्षा जास्त काळ वेदनाशामक औषध घेऊ नका, यामुळे रीबाउंड डोकेदुखी होऊ शकते.
-
मायग्रेनला चालना देणारे पदार्थ टाळावे : जुने चीज, अल्कोहोल, प्रक्रिया केलेले मांस, चॉकलेट किंवा कृत्रिम गोड पदार्थ टाळा.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : फ्रीपिक)
Migraine Tips: मायग्रेन सुरू होण्यापूर्वी दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे; जाणून घ्या काय करावे आणि काय नाही
काही लोकांना मायग्रेन सुरू होण्यापूर्वी काही लक्षणे दिसू लागतात, ज्याला प्रोड्रोम म्हणतात. मायग्रेन सुरू होण्याच्या काही तास किंवा दोन दिवस आधी ही लक्षणे दिसू शकतात. अशा वेळेस काय करावे, जाणून घ्या.
Web Title: Migraine tips these severe symptoms appear before the onset of migraine know the dos and donts pvp