-
ड्राय फ्रुट्समध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात, ज्याच्या सेवनाने अनेक गंभीर आजार टाळता येतात. पण या एका ड्राय फ्रूटला खूप आरोग्यदायी म्हणतात. याचे सेवन केल्याने शरीराला एक नव्हे तर नऊ प्रकारे फायदे मिळतात.
-
आपण ज्या ड्रायफ्रुट्सबद्दल बोलत आहोत ते अंजीर आहे, ज्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर आणि कॉपर व्यतिरिक्त इतर अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, भिजवलेल्या अंजीरमधील पोषकतत्त्वे आणखी वाढतात.
-
अंजीरमध्ये नैसर्गिक गोडवा असतो पण तरीही त्याच्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे अंजीर मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो. यासोबतच भिजवलेल्या अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. -
जर तुम्हाला पचनाच्या समस्यांमुळे त्रास होत असेल, तर भिजवलेल्या अंजीराचे नियमितपणे रिकाम्या पोटी सेवन करा. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया व्यवस्थित होते. -
लहान मुलांसाठी अंजीर खूप फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळतात ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. -
व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स यांसारख्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या अंजीरच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
-
पोटॅशियम शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करते आणि अंजीरमध्ये ते मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या असल्यास अंजीरचे सेवन फायदेशीर असते. -
लोहयुक्त अंजीर खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते, ज्यामुळे ॲनिमियासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. -
अंजीरमध्ये जास्त फायबर आणि कमी कॅलरीज असतात, ज्याच्या सेवनाने वजन नियंत्रित करण्यास मदत करतात. (सर्व फोटो: फ्रीपीक)
Healthy Living: दररोज ड्राय-फ्रूटचे सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात दूर; जाणून घ्या ‘या’ पौष्टिक पर्यायाबाबत
ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात नियमित्त सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होऊन हे आरोग्यसमस्या देखील कमी करतात.
Web Title: Healthy living consuming dry fruits daily can prevent many health problems learn about this nutritional alternative arg 02