• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. krishna janmashtami simple decoration ideas for bal gopal temple at home pooja ghar decoration jshd import dvr

Krishna Janmashtami: जन्माष्टमीला श्रीकृष्णासाठी अशाप्रकारे सजवा तुमचं देवघर; ‘या’ १० टिप्स करतील तुम्हाला मदत

Krishna Janmashtami: जन्माष्टमी ही भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाते आणि या दिवशी घराच्या सजावटीचे विशेष महत्त्व आहे. या जन्माष्टमीला तुमचं देवघर सुंदर बनवू शकेल अशा काही सजावटीच्या टिप्स येथे आहेत.

Updated: August 23, 2024 21:07 IST
Follow Us
  • janmashtami decoration ideas
    1/11

    यावर्षी कृष्ण जन्माष्टमी हा सण २६ ऑगस्टला साजरा होणार आहे. या निमित्ताने लोक आपली घरे, मंदिरे सजवतात आणि कृष्णाचे बालरूप लाडू गोपाळाला सजवतात. अशा वेळेस आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्या मदतीने तुम्ही तुमच्या मंदिराला अतिशय सुंदर पद्धतीने सजवू शकता.

  • 2/11

    फुलांची सजावट
    देवघराच्या सजावटीसाठी फुलांचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी तुम्ही मंदिर सजवू शकता तसेच मंदिराच्या भिंतींवरदेखील तुम्ही फुलांनी सजावट करू शकता. झेंडू, चमेली आणि गुलाबाची फुले विशेष शुभ मानली जातात.

  • 3/11

    दिव्यांचा वापर
    जन्माष्टमीनिमित्त देवघर दिव्यांनी सजवा. दिवे विशेषतः या उत्सवाचे सौंदर्य वाढवतात. पूजेच्या वेळी रात्रीच्या अंधारात दिव्यांचा प्रकाश आनंनदायी वातावरणाची निर्मिती करतो.

  • 4/11

    झोपाळ्याची सजावट
    भगवान श्रीकृष्णाच्या झोपाळ्याला सजवण्याची ही एक पारंपारिक पद्धत आहे. एक सुंदर झोपाळा सजवा आणि त्यात श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करा. झोपाळ्याला फुलांनी आणि रंगीबेरंगी कपड्यांनी सजवायला विसरू नका.

  • 5/11

    मडके आणि लोणी
    देवघरात एक लहानसे मडके आणि लोणी देखील ठेवता येऊ शकते. भगवान कृष्णाला लोणी खूप आवडते, म्हणून अशी सजावटदेखील तुम्ही करू शकता.

  • 6/11

    मोराची पिसे आणि बासरी
    मोराची पिसे आणि बासरी हे भगवान श्रीकृष्णाचे प्रतीक आहेत. देवघरात सजावट म्हणून त्यांचा वापर करू शकता. भिंतींवर किंवा दरवाजांवर मोराची पिसे लावा आणि बासरी मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ ठेवा. ही सजावट केवळ सुंदर दिसत नाही तर याला धार्मिक महत्त्वही आहे.

  • 7/11

    हिरवळ
    भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांसह जंगलात गायी आणि शेळ्या चरायला घेऊन जात असत. हा विचार करून, मंदिराच्या आजूबाजूला लहान कुंड्यांमध्ये रोपे लावून देवघराची सजावट देखील करू शकता.

  • 8/11

    रांगोळी
    देवघराच्या प्रवेशद्वारावर आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढा. नैसर्गिक रंगांनी सजवा आणि आकर्षक डिझाइनसह सजावट पूर्ण करा.

  • 9/11

    सजावटीचे कापड आणि कपडे
    श्रीकृष्णाच्या मूर्तीला सुंदर वस्त्रे परिधान करून सजवा. सुंदर वस्त्र, दागिने यामुळे देवाची पूजा आणखीनच खास बनते. तुम्ही मंदिराभोवतीदेखील रंगीबेरंगी कपड्यांनी सजावट करू शकता.

  • 10/11

    कृत्रिम धबधबे आणि पाण्याची सजावट
    तुम्ही देवघर कृत्रिम धबधबे आणि पाण्याने देखील सजवू शकता. हे ताजेतवाने आणि शांत वातावरण तयार करण्यात मदत करते. यासोबतच वाहत्या पाण्याचा आवाजही एक सुखद अनुभव देतो.

  • 11/11

    लाईटिंग
    सजावटीत लाईटिंगला विशेष महत्त्व आहे. रंगीबेरंगी लाईट्सने वापर करून देवघर सजवा. त्यामुळे वातावरणात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.
    (Photo Courtesy: Pexels)

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२४Krishna Janmashtami 2024फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto Galleryलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Krishna janmashtami simple decoration ideas for bal gopal temple at home pooja ghar decoration jshd import dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.